शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

"लग्नाला नक्की या, पण जेवणाचं बिलही देऊन जा", वधूचं अनोखं फर्मान!  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 17:34 IST

ब्रिटेनमधील एका मॉडेलची आर्थिक बाजू मजबूत आहे मात्र तरीदेखील ती तिच्या लग्नाचा खर्च पाहुण्यांकडून वसूल करत आहे.

नवी दिल्ली : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या जीवनातील एक अद्भुत सोहळा आहे, कारण यादिवसापासून नवदाम्पत्याच्या एका नवीन जीवनाची सुरूवात होत असते. लग्नासाठी पाहुणे मंडळीपासून ते निकटवर्तीय सर्वच जण हजेरी लावतात. अशावेळी कोणाच्याही खाण्या-पिण्याबाबत हलगर्जीपणा केला जात नाही. मात्र,  परदेशातील एका मॉडेलचं लग्न या सर्वाला अपवाद ठरलं आहे. कारण मॉडेलनं स्पष्टपणे सांगितलं आहे की, लग्न शानदार पद्धतीनं करणार आहे, परंतु उपस्थित पाहुण्यांना स्वतःच्या जेवणाचं बिल द्यावं लागणार आहे. 

ब्रिटेनमधील या मॉडेलनं आपल्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना पैशांचे नियोजन करून येण्यास सांगितलं आहे. म्हणजेच तुम्ही लग्नाला जरूर या, पण सोबत जेवणाचा खर्च देखील देऊन जा. मॉडेलचं हे अनोखं फर्मान खूप चर्चेचा विषय बनलं आहे. एवढंच नाही तर तिनं आपलं लग्न कमी खर्चात करण्याची योजना आखली आहे.

मिरर'नं दिलेल्या वृत्तानुसार, ४० वर्षीय मॉडेल कार्ला बलुची आलिशान पद्धतीनं लग्न करणार आहे. विशेष बाब म्हणजे ४ मुलांची आई असलेली कार्ला ही ५२ वर्षीय मंगेतर जोवानीसोबत लग्नगाठ बांधणार असून या लग्नात एकूण ३८ लाख रूपये खर्च होणार आहेत. कार्लाचं लग्न इतर लग्नांपेक्षा खूप वेगळं असल्यामुळं चर्चेचा विषय बनला आहे. कारण, या लग्नासाठी जाणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला ९ हजार रूपये द्यावे लागणार आहेत. एवढंच नाही तर हॉटेलचा खर्चही सुमारे दोन लाख रुपये असणार आहे.

मोफत जेवण देणं पडेल महागातब्रिटेनच्या हर्टफोर्डशायर येथे राहणारी कार्लाची आर्थिक बाजू मजबूत आहे. तरी देखील तिला आपले पैसे खर्च करायचे नाहीत असे ती म्हणते. विशेष म्हणजे आपल्या अनोख्या लग्नासाठी तिनं केवळ ३० पाहुण्यांना आमंत्रित केलं आहे. लग्नासाठी पांढरे घोडे, फाइव्ह स्टार हॉटेल्स आणि कपड्यांवर बराच खर्च करण्यात आला आहे. एन्गेजमेंट रिंगची किंमत देखील ६ लाख रुपये आहे. त्यामुळे कार्लाला लग्नात उपस्थित राहणाऱ्या मंडळींकडून पैसे आकारून या सर्वाची भरपाई करायची आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाmarriageलग्न