शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

२ वर्षीय चिमुकलीच्या चाव्यामुळे विषारी सापाचा मृत्यू; दुधाच्या दातांनी घेतला बदला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2022 10:38 IST

सोशल मीडियावर नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) नेहमी काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. काही गोष्टी तर अशा असतात ज्याच्यावर विश्वास देखील ठेवणे कठीण असते. सध्या एका चिमुकलीसोबत घडलेले अनोखे प्रकरण याचाच एक प्रत्यय आहे. कारण अवघ्या २ वर्षाच्या मुलीने आपल्या रक्षणासाठी विषारी सापाचा सामना केला आणि त्यामध्ये विजयही मिळवला. या चिमुकलीने केलेल्या धाडसी कृत्यामुळे तिचा जीव वाचला आहे. खरं तर झाले असे की या मुलीने स्वत:ला वाचवण्यासाठी दुधाच्या दातांनी सापाचा चावा घेतला (Toddler Bites Snake With Teeth) आणि आपला जीव वाचवला. 

लहानग्या मुलीला अशा अवस्थेत सर्वप्रथम तिच्या शेजाऱ्यांना पाहिले होते. मुलीने केलेला आरडाओरडा कानावर पडताच शेजाऱ्यांनी तिच्याकडे धाव घेतली असता तिच्या तोंडात मेलेला साप पाहायला मिळाला. यासोबतच तिच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर सर्पदंशाच्या काही खुणाही होत्या. मुलीला लगेच सापापासून वेगळे करण्यात आले आणि उपचारासाठी जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले.  चिमुकलीच्या तोंडात सापही संपूर्ण घटना १० ऑगस्ट रोजी घडली असल्याचे बोलले जात आहे. तुर्कस्तानच्या बांगोल शहरात असलेल्या कांतार या छोट्याशा गावात ही घटना घडली. इथे २ वर्षीय मुलीला सापाने चावले असता दिला रूग्णालयात डमिट करावे लागले. हा साप जवळपास अर्धा मीटर होता असे जात आहे. त्याने मुलीच्या ओठांवर चावा घेतला होता त्यामुळे २४ तास मुलीला डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. 

धाडसी कृत्यामुळे वाचला जीव दरम्यान, आता चिमुकलीची प्रकृती स्थिर असून तिला घरी सोडण्यात आले आहे. माहितीनुसार, ती खेळत असताना अचानक सापाजवळ पोहचली आणि सापासोबत खेळायला लागली. मात्र सापाने आपले रौद्ररूप धारण करून चिमुकलीचा चावा घेतला. यामुळे मुलीला राग आला आणि तिने सापाला आपल्या दातांनी जोरात चावा घेऊन यमसदनी धाडले. 

 

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाInternationalआंतरराष्ट्रीयsnakeसापhospitalहॉस्पिटल