शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंसाठी विधानसभेची लढाई कठीण; अरविंद सावंतांना वरळीतून किती मते मिळाली?
2
राहुल गांधी गुंतवणूकदारांची दिशाभूल करत आहेत; 'त्या' आरोपांवर पीयूष गोयल यांचा पलटवार
3
बाबर आजमने 'विराट' विक्रम मोडला! पण, अमेरिकेसमोर पाकिस्तानचा संघ ढेपाळला 
4
'खटाखट'मुळे काँग्रेस कार्यालयाबाहेर 'फटाफट' रांगा; गॅरंटी कार्ड घेऊन महिला पोहचल्या 
5
राहुल द्रविड, अजित आगरकर यांनी न्यूयॉर्कमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहिली
6
बारामतीतून निवडणूक लढवणाऱ्या शरद पवार नावाच्या उमेदवाराला किती मतं पडली?
7
१० रुपयांची भीक, ५६०ची दारू अन् चिमुकल्याचे अपहरण; 'फोन -पे' मुळे छडा, आरोपी जेरबंद
8
PAK vs USA Live : मुंबईच्या सौरभने पाकिस्तानची जीरवली, टेलरच्या अफलातून कॅचने रिझवानची विकेट मिळवली, Video 
9
मोदी 3.0 फार काळ टिकणार नाही; निर्मला सीतारामन यांच्या पतीचं रोखठोक मत
10
३६ जागांवर गेम झाला अन् भाजपाच्या जागांचं गणित बिघडलं; जाणून घ्या, डाव कुठे मोडला?
11
शेअर मार्केटमध्ये नेमकं काय घडलं? राहुल गांधींनी केला सर्वात मोठ्या घोटाळ्याचा आरोप...
12
मारहाणीच्या घटनेवर कंगनानं मौन सोडलं, चंदीगड विमानतळावर नेमकं काय घडलं? सर्व VIDEOमध्ये सांगितलं
13
कंगना रणौतला कानाखाली का मारली? CISF महिला जवानाने सांगितलं कारण; व्हिडीओ व्हायरल
14
मजेशीर Video! Dale Steyn ला अमेरिकेत T20WC साठी नेमलेला कर्मचारी शिकवतोय गोलंदाजी
15
विधानसभा निवडणुकीत बारामतीत अजितदादांविरोधात युगेंद्र पवार मैदानात? आव्हाडांचे सूचक भाष्य
16
याला म्हणतात परतावा! 1 वर्षात पैसा डबल, आजही 15% नं वाढला भाव; आता कंपनी स्प्लिट करणार शेअर?
17
TDP आणि BJP मध्ये झालं एकमत; सरकारमध्ये सहभागी होण्याचा 'असा' ठरला फॉर्म्युला?
18
नितीश कुमारांच्या अनावश्यक मागण्या मान्य करणार नाही; भाजपने स्पष्टच सांगितले...
19
उद्धव ठाकरे पुन्हा एनडीए'मध्ये जाणार का? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं
20
कंगना रणौतला चंदीगड विमानतळावर मारहाण; CISF महिला जवानाने मारली कानाखाली

झपाटलेल्या गावच्या ८२ वर्षीय आजोबांची प्रेमकहाणी पूर्ण होणार; ५० वर्षांनंतर प्रेयसी भारतात येणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2021 5:30 AM

राजस्थानातील झपाटलेल्या गावात प्रेमकथेचा पुनर्जन्म

जैसलमेर : राजस्थानच्या जैसलमेर जिल्ह्यात एका गावाची ‘झपाटलेले गाव’ अशी ओळख आहे. पण, या झपाटलेल्या गावातच एका अनाेख्या प्रेमकथेने पुनर्जन्म घेतला आहे. या प्रेमकथेचा नायक आहे ८२ वर्षांचा एक चाैकीदार आणि नायिका आहे ऑस्ट्रेलियात राहणारी. या दाेघांची तब्बल ५० वर्षांनी भेट हाेणार असून, त्याची उत्सुकता दाेघांनाही लागलेली आहे.एखाद्या चित्रपटाला शाेभेल अशीची ही कथा जैसलमेरमधील कुलधारा गावात प्रत्यक्षात घडली आहे. ‘ह्युमन्स ऑफ बाॅम्बे’ या फेसबुक पेजवरून या प्रेमकथेला वाचा फाेडण्यात आली आहे. गावातल्या झपाटलेल्या कथांची कीर्ती दूरवर पसरली आहे. विज्ञानवादी लाेकांनी यामागे वेगवेगळी कारणे दिली. मात्र, गावकऱ्यांचा हे गाव झपाटलेले आहे, यावर ठाम विश्वास हाेता. त्यामुळे अनेक वर्षांपूर्वीच लाेकांनी गाव साेडले. आता वाळवंटातील या ओसाड गावात केवळ ८२ वर्षांचा एक चाैकीदार राहताे. या चाैकीदाराचीच ही कहाणी आहे. सत्तरीच्या दशकात जैसलमेरला त्यांची ऑस्ट्रेलियातून आलेल्या मरीनासाेबत सर्वप्रथम भेट झाली हाेती. ती पाच दिवसांच्या पर्यटनासाठी आली हाेती. त्यावेळी त्यांनी मरीनाला उंटाची स्वारी शिकविली. दाेघांचेही पहिल्या नजरेतच एकमेकांवर प्रेम जडले. ऑस्ट्रेलियाला परतताना मरीनाने प्रेमाचे तीन शब्द बाेलून भावनांना वाट माेकळी केली. त्यानंतर ती ऑस्ट्रेलियाला परतल्यानंतरही दाेघांमध्ये पत्रव्यवहार सुरू हाेता. मरीनाने त्यांना ऑस्ट्रेलियाला येण्याचे आमंत्रण दिले. ते त्यावेळी तब्बल ३० हजार रुपये खर्च करून ऑस्ट्रेलियात काही महिने वास्तव्यही करून आले. मात्र, लग्नाच्या मुद्द्यावरून दाेघे वेगळे झाले. दाेघांनाही आपला देश साेडायचा नव्हता. भारतात परतल्यावर या चाैकीदाराने कुटुंबीयांच्या दबावानंतर लग्न केले. त्यांना दाेन मुलेही झाली. त्यांच्या पत्नीचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू झाला. आता ८२ व्या वर्षी प्रेयसी भेटणार म्हणून ते आनंदी आहेत.ऑस्ट्रेलियातून ‘ती’ लवकरच येत आहे भारतातविभक्त झाल्यानंतर आता ५० वर्षांनी त्यांना मरीनाने पत्र पाठवले आहे. मरीनाने अद्याप लग्न केलेले नसल्याची माहितीही या पत्रातून त्यांना दिली. ती लवकरच भारतात येत आहे. तब्बल ५० वर्षांनी प्रेयसी भेटणार असल्याचा आनंद त्यांना आहे. भविष्यात या दाेघांपुढे काय वाढून ठेवलेले आहे, याची त्यांना कल्पना नाही. मात्र, आपले पहिले प्रेम जिवंत असून, स्वस्थ आणि आनंदी असल्याचे त्यांना समाधान जास्त आहे.