शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
3
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
4
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
5
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
6
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
7
ना करुण नायर, ना श्रेयस अय्यर, ना साई सुदर्शन... ३ नंबर बॅटिंगसाठी गांगुलीची कुणाला पसंती?
8
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?
9
कोण आहेत १२४ वर्षीय मिंता देवी? ज्यांच्या नावाचं टी-शर्ट घालून विरोधकांचा संसदेत राडा!
10
पंजाब पोलिसांची मोठी कारवाई; बब्बर खालसा संघटनेशी संबंधित ५ दहशतवाद्यांना अटक
11
आसिम मुनीर यांना सारखं अमेरिकेत बोलावून भारतच नव्हे, तर 'या' तीन देशांनाही इशारा देतायत डोनाल्ड ट्रम्प!
12
'परम सुंदरी'च्या रोमँटिक केमिस्ट्रीवर भाळले प्रेक्षक, सिनेमात कॉमेडीचाही तडका; ट्रेलर रिलीज
13
१४, १५ की १६ ऑगस्ट? नेमकी कधी आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी? पाहा, शुभ मुहूर्त, महत्त्व, मान्यता
14
पोरी हुश्शार! भारतीय महिला फुटबॉल टीमने रचला इतिहास, २० वर्षांनी आशियाई कपसाठी क्वालिफाय
15
या ऑटो कंपनीने सर्वांवर कडी केली...! १० वर्षांची एक्स्टेंडेड वॉरंटी स्कीम आणली, आधीच तीन वर्षे...
16
“काँग्रेसने जनहिताची भरपूर कामे केली, सोशल मीडियावर सक्रीय व्हा”; कार्यकर्त्यांना कानमंत्र
17
ना भीती, ना ढोंग, ना पश्चाताप.., Gen Z आणि मिलेनियल्सबाबत काय म्हणाले अमन गुप्ता?
18
तेजश्री प्रधानचं वय माहितीये का? सुंदर दिसण्यासाठी करते फक्त 'ही' एकच गोष्ट
19
"चल हट, येथून निघून जा...", भाजपा नेत्याच्या मुलाची गुंडगिरी, पोलीस कॉन्स्टेबलशी गैरवर्तन
20
'छावा', 'द काश्मीर फाईल्स' सारखे सिनेमे बनवणार नाही, जॉन अब्राहम असं का म्हणाला?

12th Fail: कठीण काळातील सोबती ते...! IPS मनोज शर्मा यांच्या जुन्या फोटोवर प्रेमाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2024 17:18 IST

१२वी फेल चित्रपट अनुराग पाठकच्या 12th Fail पुस्तकावर आधारित आहे.

12th fail movie: संघर्षमय काळात प्रेयसीने दिलेली साथ आणि त्यातून मिळालेलं यश म्हणजे IPS अधिकारी मनोज शर्मा यांची प्रेरणादायी कहाणी. त्यांच्या जीवनावर आधारित बनलेला 12th फेल हा चित्रपट चाहत्यांना भुरळ घालत आहे. आयपीएस मनोज शर्मा (IPS Manoj Sharma) यांच्या जीवनावर आधारित 12th Fail या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत अभिनेता विक्रांत मेसी (Vikrant Massey) झळकला असून, त्याच्या ऑपोझीट मेधा शंकर (Medha Shankar) हिने साकारलेली श्रद्धा जोशीची भूमिका प्रेक्षकांना भावली. 

मेधाने साकारलेल्या दमदार सर्पोटिव्ह पार्टनरच्या भूमिकेमुळे ती रात्रोरात प्रसिद्धीच्या झोतात आली. शिवाय निखळ सौंदर्यामुळे नेटकरी तिला आज नॅशनल क्रश (National Crush) असे संबोधत आहेत. बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची चर्चा रंगली असताना आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांनी पत्नी श्रद्धासोबतचा एक जुना फोटो शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहले की, लग्नानंतरच्या काही दिवसांचा फोटो आज मिळाला. मनोज शर्मा यांची कहाणी म्हणजे कठीण काळातील सोबती ते सुवर्ण क्षणांचे साक्षीदार अशीच काहीशी आहे. 

फोटो सोशल मीडियावर पोस्ट करताच नेटकऱ्यांनी कमेंटचा वर्षाव केला. अनेकांनी या फोटोचा त्यांच्या स्वप्नांशी संबंध जोडला तर काहींना विक्रांत मेसीचा चित्रपट आठवला. एका युजरने या फोटोवर प्रतिक्रिया दिली आणि म्हटले की, तुम्ही खूप नशीबवान आहात की आज संपूर्ण देश तुमची प्रेमकथा पाहत आहे आणि त्याचे कौतुक करत आहे.  

१२वी फेलची चित्रपटाची कहाणी १२वी फेल चित्रपट अनुराग पाठकच्या याच नावावरील पुस्तकावर आधारीत आहे. यात विक्रांतसोबत मेधा शंकर, अनंत वी जोशी, अंशुमान पुष्कर आणि प्रियांशु चटर्जी प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाद्वारे आयपीएस अधिकारी मनोज शर्मा यांची कथा रेखाटण्यात आली आहे, जे १२वीत फेल होते. त्यानंतर त्यांनी वेगळीवेगळ्या ठिकाणी काम केले आणि सोबत युपीएससीच्या तयारीला लागले आणि यशाचे शिखर गाठले. 

टॅग्स :Vikrant Masseyविक्रांत मेसीSocial Viralसोशल व्हायरलLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट