शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

वय वर्ष फक्त १२! या चिमुकलीने कोणत्याही साधनाशिवाय पाडले अख्खे झाड, कसे? पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2022 19:29 IST

एका १२ वर्षीय चिमुकलीने चक्क आपल्या हाताने झाडावर बुक्की मारत भलंमोठं झाडं पाडलं आहे (Girl Punching Down a Tree Using her Boxing Skills). या मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे.

आपल्या मुलांना थोडी दुखापत झाली तरी आपण काळजी करत बसतो. मात्र, तुम्हाला हे समजून घेण्याची गरज आहे की लहान मुलं इतकी नाजूक नसतात. हे आज आम्ही तुम्हाला यासाठी सांगत आहोत, कारण एका १२ वर्षीय चिमुकलीने चक्क आपल्या हाताने झाडावर बुक्की मारत भलंमोठं झाडं पाडलं आहे (Girl Punching Down a Tree Using her Boxing Skills). या मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल (Viral Video on Social Media) होत आहे.

इंटरनेटवर सर्वात स्ट्राँग गर्ल (Strongest Girl) म्हणून प्रसिद्ध झालेल्या इव्हनिका सद्वकासची बॉक्सिंग खरोखरच थक्क करणारी आहे. ती इतकी ताकदवान आहे की अगदी मोठमोठ्यांनाही काही मिनिटांत धूळ चारू शकते. रशियातील या मुलीचा एक व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती झाडावर बुक्क्यांनी मारताना दिसत आहे.

इव्हनिका ही मूळची रशियाची असून ती लहानपणापासून बॉक्सिंगचा सराव करत आहे. तिचे वडील रुस्ट्रम हे स्वतः बॉक्सिंग प्रशिक्षक आहेत आणि त्यांच्या प्रशिक्षणात इव्हनिका इतकी कुशल बॉक्सर बनली आहे की तिच्यासमोर एक झाडही टिकू शकत नाही. व्हिडिओमध्ये ही मुलगी झाडाला बुक्क्यांनी मारताना दिसते. वेग आणि ताकदीने तिने आधी झाडाला बुक्क्या मारून कमकुवत केले आणि नंतर हळूहळू झाड कोसळले. हा व्हिडीओ पाहून सगळेच थक्क झाले आहेत.

इव्हनिकाचे वडील रुस्ट्रम यांच्याशिवाय तिच्या ७ भावंडांनाही बॉक्सिंगची तितकीच आवड आहे. मुलांची आई आनियादेखील एक अव्वल क्रीडापटू होती, परंतु ती एक जिम्नॅस्ट होती. एका मिनिटात ६५ पंच मारण्याचा विश्वविक्रमही १२ वर्षीय इव्हनिकाच्या नावावर आहे. ती आपल्या शक्तिशाली ठोसेने दरवाजे आणि सर्व मजबूत वस्तू तोडण्यात माहिर आहे. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षापासून ती तिच्या कौशल्यावर काम करत आहे. मुलीची आवड पाहून वडिलांनीही तिला बॉक्सिंगसाठी तयार करण्यास सुरुवात केली आणि त्याचा परिणाम आता सर्वांसमोर आहे.

टॅग्स :Social Viralसोशल व्हायरलSocial Mediaसोशल मीडियाTwitterट्विटर