जिल्हा परिषद उपाध्यक्ष निवड १६ फेब्रुवारीला

By Admin | Updated: February 7, 2016 00:51 IST2016-02-07T00:51:48+5:302016-02-07T00:51:48+5:30

कोणाला संधी याची उत्सुकता

Zilla Parishad vice presidential election will be held on 16th February | जिल्हा परिषद उपाध्यक्ष निवड १६ फेब्रुवारीला

जिल्हा परिषद उपाध्यक्ष निवड १६ फेब्रुवारीला

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदाची निवडणूक १६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी लावली आहे. उपाध्यक्षपदी एकनाथ नाडकर्णी यांचे नाव आघाडीवर असून काँग्रेसचे नेते नारायण राणे या पदावर कोणाला संधी देतात, याची उत्सुकता आता सर्वांना आहे.
उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी या पदाचा राजीनामा ३० जानेवारी रोजी दिला होता. त्यानंतर आता या रिक्त पदाची निवडणूक जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी लावली आहे. उपाध्यक्ष पदासह कृषी आणि पशुसंवर्धन सभापतीपदाची जबाबदारी या उपाध्यक्ष पदाच्या नेतृत्वाकडे सोपविली जाणार आहे.
एकनाथ नाडकर्णी हे आक्रमक नेतृत्व असून दोडामार्ग तालुक्यातून त्यांचे प्रतिनिधीत्व आहे. आताच्या पदाधिकारी निवडीत मालवण, कणकवली, वैभववाडी या तालुक्यांमधील नेतृत्वांना संधी मिळाली आहे तर दोडामार्गमधून अंकुश जाधव यांना सातत्याने संधी मिळाली आहे. देवगड, वेंगुर्ला आणि कुडाळ या तालुक्यातील नेतृत्व संधीच्या प्रतीक्षेत आहेत. आता जिल्हा परिषदेच्या पन्नासही मतदारसंघातील झालेली विकासकामे यादृष्टीने त्या त्या मतदारसंघातील नेतृत्व सक्रीय झाली आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Zilla Parishad vice presidential election will be held on 16th February