जिल्हा परिषदेचे शिक्षक पुरस्कार जाहीर
By Admin | Updated: September 5, 2014 00:17 IST2014-09-04T23:04:25+5:302014-09-05T00:17:10+5:30
पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे

जिल्हा परिषदेचे शिक्षक पुरस्कार जाहीर
कणकवली : ५ सप्टेंबर या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे सन २०१४-१५ चे आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते यांनी गुरुवारी जाहीर केले.
या पुरस्कारांमध्ये कणकवली तालुक्यातून प्रदीप मांजरेकर (पदवीधर शिक्षक जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वरवडे नं. १), वैभववाडी तालुक्यातून सुहास रावराणे (मुख्याध्यापक, कोळपे मराठी), कुडाळ तालुक्यातून शशांक आटक (पदवीधर शिक्षक), वेंगुर्ला तालुक्यातून भिवा सावंत (पदवीधर शिक्षक), सावंतवाडीतून विठ्ठल सावंत (पदवीधर शिक्षक), दोडामार्ग तालुक्यातून आनंद नाईक, मालवण तालुक्यातून सुभाषचंद्र नाटेकर (मुख्याध्यापक) तर देवगड तालुक्यातून संदीप परब (पदवीधर शिक्षक) यांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार समितीमध्ये जिल्हा परिषद उपाध्यक्ष संदेश सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण समिती सभापती प्रकाश कवठणकर, महिला व बालकल्याण सभापती श्रावणी नाईक, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव, प्राथमिक शिक्षणाधिकारी आर. पी. धाकोरकर, प्राचार्य डाएट यांचा समावेश होता. या सर्व शिक्षकांच्या पुरस्कारांना कोकण आयुक्त यांनी मंजुरी दिली आहे. लवकरच या पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)