शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला जलजीवन मिशन योजनेचा आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 17:18 IST

Zp Kudal Sindhudurg : जलजीवन मिशन या केंद्रपुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी कुडाळ तालुक्याचा दौरा केला.

ठळक मुद्देजिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला जलजीवन मिशन योजनेचा आढावाकुडाळ तालुक्याला भेट, कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश

कुडाळ : जलजीवन मिशन या केंद्रपुरस्कृत योजनेच्या अंमलबजावणीच्या निमित्ताने आढावा घेण्यासाठी मंगळवारी जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी कुडाळ तालुक्याचा दौरा केला.यावेळी जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष व सदस्य रणजित देसाई, सभापती नूतन आईर, गटविकास अधिकारी विजय चव्हाण, कुडाळ तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, बाव सरपंच नागेश परब, पावशीचे माजी सरपंच पप्या तवटे, बॅ. नाथ पै शिक्षण संस्थेचे अध्यक्ष उमेश गाळवणकर, डॉ. संजय निगुडकर आदी उपस्थित होते.यावेळी सावंत यांनी कुडाळ नाबरवाडी येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्र इमारत बांधकाम ठिकाणी भेट दिली. ५० निवासी रूम व प्रशिक्षण हॉल असलेल्या या भव्यदिव्य केंद्राचे बांधकाम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्याबाबत संबंधित यंत्रणेस आदेश दिले.त्यानंतर उमेश गाळवणकर यांनी सुरू केलेल्या कोविड सेंटरला भेट दिली. ते राबवित असलेल्या सामाजिक उपक्रमाबद्दल कौतुक करून जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य पुरविण्यात येईल, असे आश्वासन दिले. सोबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी अध्यक्ष यांच्या सहमतीने रोटेशन पद्धतीने काही डॉक्टर्स व परिचारक उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कार्यवाही होत असल्याचे सांगितले. सभापती नूतन आईर यांनी सर्वांचे आभार मानले. या बैठकीचे चांगले नियोजन केल्याबद्दल संजना सावंत यांनी गटविकास अधिकारी विजय चव्हाण यांचे कौतुक केले.तालुक्यातील सर्व शाळा व अंगणवाड्या यामध्ये पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टीने नियोजन झालेले असून ज्या ग्रामपंचायतींना कार्यारंभ आदेश मिळाले नसतील तर त्या ग्रामपंचायतीने ते प्राप्त करून घ्यावेत. याबाबत कोणत्याही ग्रामपंचायतीची गरसोय होत असल्यास याबाबत आपल्याशी थेट संपर्क साधण्याच्या सूचना अध्यक्ष संजना सावंत यांनी दिल्या.कुडाळ तालुक्यात २१६ जण होम आयसोलेशनमध्येकुडाळ तालुक्यातील सर्व सरपंच ग्रामसेवक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य यांच्याशी ऑनलाईन पद्धतीने संजना सावंत यांनी संवाद साधला. कुडाळ तालुक्यात २१६ जण होमआयसोलेशनमध्ये असून त्यांना आवश्यक वाटल्यास रुग्णालयांमध्ये भरती करण्याबाबतदेखील दक्षता घेत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkudal police stationकुडाळ पोलिस स्टेशनsindhudurgसिंधुदुर्ग