तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: September 2, 2014 23:17 IST2014-09-02T23:15:53+5:302014-09-02T23:17:17+5:30
मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

तलावात बुडून तरुणाचा मृत्यू
मालवण : अंघोळीसाठी गेलेल्या नारायण उत्तम गावडे (वय ३५, रा. नांदोस कोक्याचीवाडी) यांचा तलावात बुडून मृत्यू झाला. याबाबत मालवण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. मालवण तालुक्यातील नांदोस कोक्याचीवाडी येथे नारायण उत्तम गावडे हे परिवारासह राहत होते. काल, सोमवारी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास नारायण गावडे हे भाऊ महेश आणि मित्र प्रकाश धोंडू खोत यांच्यासमवेत अंघोळीसाठी नजीकच्या डिकवल गावातील तलावाकडे गेले. मात्र, पोहता येत नसल्यामुळे नारायण यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रात्री त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते. आज, मंगळवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृतदेह तलावात सापडला. याबाबत चंद्रकांत गावडे यांनी मालवण ठाण्यात माहिती दिली. जी. एन. नाईक अधिक तपास करीत आहेत.