फसवणुकीच्या संशयाने युवकाची धुलाई
By Admin | Updated: September 28, 2015 23:30 IST2015-09-28T22:20:09+5:302015-09-28T23:30:49+5:30
तुम्ही ५० हजाराच्या तीन पॉलिसी काढल्यास तुम्हाला १४ कोटी रूपये मिळणार आहेत. त्यासाठी एक-दोन कोरे चेक देण्यास सांगितले.

फसवणुकीच्या संशयाने युवकाची धुलाई
मालवण : चेक घेण्यास मालवणला पोहचलेल्या एका कंपनीच्या युवकाला नागरिकांनी यथेच्छ चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. या साऱ्या प्रकाराची खातरजमा करून यात मोठे रॅकेट तर नाही ना? याचा शोध मालवण पोलीस घेत आहेत. भारत सरकारच्या इन्शुरन्सच्या लकी नंबरमध्ये आपली निवड झाली आहे. पॉलिसी नंबर दिल्यास मिळणार २ लाख ९८ हजारङ्घतर आज ५० हजारच्या तीन पॉलिसी काढल्यास १४ कोटी मिळणार असल्याचा दूरध्वनी मालवणातील संतोष लुडबे यांना आला. मात्र लुडबे यांनी आपण बाहेर असून थोड्या वेळाने फोन करण्यास सांगितले. औरंगाबाद येथून बोलणाऱ्या त्या महिलने पुन्हा फोन केला. पुन्हा फोन आल्याने हा भुलभुलैयाचा प्रकार असल्याचे संतोष लुडबे यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्या महिलेने आमचा माणूस कसालला येईल. त्याला चेक स्वरुपात रक्कम द्या आणि करोडपती व्हा असे सांगितले. काहीतरी भंपकपणा आहे असे ओळखूनही लुडबे यांनी कसाल गाठले.
लुडबे यांनी कोणतीही पॉलिसी नसताना आपण फसविले जावून यासाठी खोटा पॉलिसी नंबर दिला. नंबर दिल्यानंतर ३५ हजार भरा त्यानंतर २ लाख ९८ हजार मिळणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. शिवाय आपली भारत सरकारच्या लकी नंबर मध्ये निवड झाल्याने आपण लकी आहात. त्यामुळे तुम्ही ५० हजाराच्या तीन पॉलिसी काढल्यास तुम्हाला १४ कोटी रूपये मिळणार आहेत. त्यासाठी एक-दोन कोरे चेक देण्यास सांगितले. त्यानंतर कसाल व मालवण येथे कंपनीच्या माणसाची प्रतीक्षा सुरु झाली. तथाकथित कंपनीचा माणूस पोहचला. मात्र त्यापूर्वीच कोणतरी फसवणुकीच्या इराद्याने येत असल्याची जाणीव झाल्याने लुडबे यांच्या सहकाऱ्यांनी त्या युवकास चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र, घटनेची नोंद रात्री उशिरापर्यत पोलिसात झाली नव्हती.फसवणुकीच्या या प्रकारामुळे अजूनही समाजात कशाप्रकारे फसविले जात आहे. ते उघड झाले. मात्र, यात लुडबे यांनी दाखविलेली हुशारी प्रकार उघडकीस कारणीभूत ठरली. (प्रतिनिधी)
मी तर पगारी नोकर : युवकाची विनवणी
पकडण्यात आलेला तो युवक यात आपला काहीही संबध नाही. मी खासगी इन्शुरन्सकडे कामास आहे. राजापूर तळगाव येथे माझे घर असून तीन महिन्यापूर्वी अकरा हजाराच्या पगारावर या कंपनीत नोकरीस आहे. आज कोल्हापूर येथील आमच्या वरिष्ठांनी सांगितल्या प्रमाणे चेक नेण्यासाठी मी आलो. कोणत्याही ग्राहकाकडून आपण रोख स्वरुपात पैसे घेतलेले नाहीत. कंपनीचा वा वरीष्टांचा कोणताही इरादा असल्याचा आपल्या माहिती नाही. आपण पगारी नोकर आहोत. माज्या राजापूर येथील घरात खातरजमा करावी अशी विनवणी तो युवक करत होता.