नापास झाल्याने युवकाची आत्महत्या
By Admin | Updated: June 23, 2014 01:31 IST2014-06-23T01:14:29+5:302014-06-23T01:31:32+5:30
येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीच्या मागे काल, शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटली आहे

नापास झाल्याने युवकाची आत्महत्या
सावंतवाडी : येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीच्या मागे काल, शनिवारी गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटली आहे. हा युवक सावंतवाडीतील असून, त्याचे नाव सागर पाटील असे आहे. तो येथील कळसूलकर इंग्लिश स्कूलमधील विद्यार्थी होता. दहावीत नापास झाल्यानेच त्याने आत्महत्या केली आहे. या युवकाला दोन दिवसांपूर्वी बांदा चेकपोस्टजवळ पोलिसांनी पाहिले असल्यामुळेच ही ओळख पटण्यास मदत झाली आहे.
काल, शनिवारी सायंकाळी उशिरा सावंतवाडी येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीच्या खोलीत असलेल्या झाडाच्या मुळाला गळफास घेऊन युवकाने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले होते. त्याची ओळख पटलेली नव्हती. पोलिसांनी सर्वत्र शोधाशोध केली, पण त्यांची ओळख कोणीच सांगत नव्हते. अनेकजण हा लमाणी कामगार असल्याचे म्हणत होते; पण आज, रविवारी सायंकाळी या युवकाची बांदा पोलिसांमुळे ओळख पटली. हा युवक गुरुवारी बांदा येथून मावशीच्या घराकडून सावंतवाडी येथे येताना दुपारच्या दरम्यान दिसून आला होता. त्यावेळी पोलिसांनी या युवकाची विचारपूस केली असता, मावशीच्या घरी गेलो होतो.
आता सावंतवाडी येथे घरी जात असल्याचे सांगितले होते. तसेच दहावीत नापास झाल्याचेही त्याने पोलिसांकडे सांगितले होते. यावेळी या युवकाचे छायाचित्रही पोलिसांनी काढून घेतले होते.
या छायाचित्रामुळेच पोलिसांनी हा युवक सावंतवाडीतील असल्याचे ओळखले. तसेच त्याचे घर हे उद्यानाच्या मागे असून, तो कळसूलकर हायस्कूलचा विद्यार्थी आहे.
सागर पाटील हा यावर्षी दहावीत होता आणि तो नापास झाला.
त्याने ते मनावर घेत आत्महत्या केली असावी, असा अंदाज मृत्यूपूर्वी दोन दिवस त्याने दहावीत नापास झाल्याचे बांदा पोलिसांना सांगितले होते. (वार्ताहर)