शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सांगुळवाडी फाटकवाडी येथील युवकाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 11:58 IST

सांगुळवाडी फाटकवाडी येथील सुमित रवींद्र रावराणे (३०) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास उघडकीस आला. याबाबत वडील रवींद्र निळकंठ रावराणे यांनी पोलिसांत माहिती दिली.

ठळक मुद्देसांगुळवाडी फाटकवाडी येथील युवकाची आत्महत्यासावंतवाडी माठेवाडातील विवाहितेची आत्महत्या

वैभववाडी : सांगुळवाडी फाटकवाडी येथील सुमित रवींद्र रावराणे (३०) या युवकाने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार शनिवारी सकाळी ६.३० च्या सुमारास उघडकीस आला. याबाबत वडील रवींद्र निळकंठ रावराणे यांनी पोलिसांत माहिती दिली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, शुक्रवारी रात्री जेवण आटोपून सुमित आपल्या खोलीत झोपण्यास गेला. सकाळी नेहमीप्रमाणे तो उठला नाही. म्हणून वडील निळकंठ सुमित झोपलेल्या खोलीत गेले तेव्हा सुमित गळफास घेतलेल्या स्थितीत छपराला लटकताना आढळून आला.छपराच्या वाशाला साडीने त्याने गळफास घेतला. याबाबत त्याचे वडील रवींद्र रावराणे यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. सुमितचे तीन वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. मात्र कौटुंबिक कारणांमुळे त्याने आत्महत्या केल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे.

सावंतवाडी माठेवाडातील विवाहितेची आत्महत्यासावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथे राहणाऱ्या हेमांगी शंकरप्रसाद तारी (२८) या विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली. तिला उपचारासाठी येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तत्पूर्वी ती मृत पावली. आत्महत्येमागचे कारण समजले नाही.शहरातील मच्छी व्यवसायिक शंकरप्रसाद तारी, त्यांची पत्नी व एक मुलगी असे तिघे जण माठेवाडा येथील घरी राहत होते. मात्र, पती शंकरप्रसाद हे काहीतरी कामानिमित्त शनिवारी सकाळी बाहेरगावी गेले होते. ते घरी नसल्याचे बघून हेमांगी यांनी विष प्राशन केले. तिला तत्काळ सावंतवाडी कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच तिचे निधन झाले होते.याबाबतची माहिती रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. याबाबतची माहिती मृत हेमांगी यांचे दीर शैलेश तारी यांनी सावंतवाडी पोलिसांत दिली. दुपारी उशिरा डॉक्टर अभिजीत चितारी यांनी शवविच्छेदन केले. विष प्राशनामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग