शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
3
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
4
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
5
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
6
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
7
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
8
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
9
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
10
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
11
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
12
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
13
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
14
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
15
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
16
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
17
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
18
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
19
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
20
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा

सरंबळ येथील युवकाला अत्याचारप्रकरणी सश्रम कारावासाची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 16:22 IST

लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करीत एका खासगी रुग्णालयात जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या प्रज्योत प्रदीप नाईक (२५, रा. सरंबळ देऊळवाडी) याला जिल्हा विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी दोषी ठरविले आहे. १० वर्षे सश्रम कारावास व पीडित मुलीला देण्यासाठी १० हजार रुपये दंड ठोठावला आहे.

ठळक मुद्देसरंबळ येथील युवकाला अत्याचारप्रकरणी सश्रम कारावासाची शिक्षालग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार

सिंधुदुर्गनगरी : लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगिक अत्याचार करीत एका खासगी रुग्णालयात जबरदस्तीने गर्भपात घडवून आणल्याप्रकरणी गुन्हा नोंद असलेल्या प्रज्योत प्रदीप नाईक (२५, रा. सरंबळ देऊळवाडी) याला जिल्हा विशेष न्यायाधीश आर. बी. रोटे यांनी दोषी ठरविले आहे. १० वर्षे सश्रम कारावास व पीडित मुलीला देण्यासाठी १० हजार रुपये दंड ठोठावला आहे.पीडित मुलगी आपल्या मावस भावासोबत गेली असता आरोपी व तिची ओळख झाली. त्यानंतर या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर प्रज्योत याने तिला लग्नाचे आमिष दाखवित एप्रिल २०१६ ते जानेवारी २०१९ या कालावधीत विविध ठिकाणी तिच्यावर अत्याचार केले. डिसेंबर २०१६ मध्ये तिचा जबरदस्ती गर्भपातही करून घेतला.

याप्रकरणी पीडित मुलीच्या तक्रारीनुसार प्रज्योत याच्यावर तसेच त्याला गर्भपात करण्यासाठी सहकार्य केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील एका डॉक्टर विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी प्रज्योत याच्यावर २७ मार्च २०१९ रोजी गुन्हा दाखल केला होता. २८ रोजी त्याला अटक केली होती. त्यानंतर त्याला १ एप्रिलपर्यंत न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती.त्यानंतर त्याला ७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्यानंतर तो जामिनावर मुक्त होता. याची सुनावणी जिल्हा विशेष न्यायालयात पूर्ण झाली असून याप्रकरणी न्यायालयाने त्याला दोषी ठरविले आहे. यावेळी एकूण सहा जणांची साक्ष घेण्यात आली. यात पीडित मुलगी व गर्भपात करणाऱ्या डॉक्टरची साक्ष महत्त्वाची ठरली.

यावेळी सरकारी पक्षाच्या वकिलांनी अत्याचार झाला त्यावेळी पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले. यामुळे न्यायालयाने साक्षी पुराव्याच्या जोरावर प्रज्योत याला दोषी ठरविले. तपासिक अंमलदार म्हणून महिला पोलीस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी काम पाहिले होते.भादवि कलम ३७६ (३), (१२) नुसार आरोपीला निर्दोष सोडले. तर ३७६ (१), (२) व अल्पवयीन बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ३, ४, ५, ६ नुसार दोषी ठरवत १० वर्षे सश्रम कारावास आणि पीडित मुलीला देण्यासाठी १० हजार रुपये दंड ठोठावला.

भादवि कलम ४१७ नुसार सहा महिने सश्रम कारावास व ५१६ अंतर्गत १ वर्ष कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. ही शिक्षा एकत्रित भोगावयाची असल्याने १० वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड ही एकत्रित शिक्षा सुनावली आहे. प्रज्योत याने सुरुवातीला भोगलेली शिक्षा कमी केली आहे. सरकारी पक्षाच्यावतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता रूपेश देसाई यांनी काम पाहिले. 

टॅग्स :Policeपोलिसsindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारी