आंबोलीत दरीत पडून युवक ठार
By Admin | Updated: July 23, 2016 23:45 IST2016-07-23T23:40:25+5:302016-07-23T23:45:03+5:30
तब्बल ९० फूट खोल दरीत कोसळला

आंबोलीत दरीत पडून युवक ठार
आंबोली : आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आलेल्या रूद्राप्पा विठ्ठल बंजेरी (वय १९, रा. नेगनीहाळा, ता. बैलहोंगल, जि. बेळगाव) या युवकाचा ९० फूट खोल दरीत कोसळून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथील नेगनीहाळा या गावातील चालकासह चौदा युवक भाड्याच्या जीपने आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते. घाट रस्त्याच्या सुरुवातीलाच पूर्वीचे वसाचे मंदिर असून, या मंदिराच्या मागे हे युवक लघुशंकेसाठी थांबले होते. यातील रूद्राप्पा हा युवक दरीच्या बाजूलाच धबधबा कसा कोसळतो, हे पाहण्यासाठी दरीजवळ गेला. यावेळी त्याचा पाय घसरून तो तब्बल ९० फूट खोल दरीत कोसळला. रूद्राप्पा हा खाली पडल्याने त्याचे डोके दगडावर आदळले आणि तो जागीच मृत झाला.