म्हापण येथील युवकाची आत्महत्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 12:29 PM2020-06-23T12:29:24+5:302020-06-23T12:30:07+5:30

म्हापण येथील एका २७ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.हा प्रकार आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. सिद्धेश भास्कर म्हापणकर ( रा.चव्हाणवाडी ) , असे त्या युवकाचे नाव आहे.दरम्यान याबाबतची खबर मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत .

Youth commits suicide in Mhapan! | म्हापण येथील युवकाची आत्महत्या !

म्हापण येथील युवकाची आत्महत्या !

googlenewsNext
ठळक मुद्देम्हापण येथील युवकाची आत्महत्या !पोलिसांनी घटनास्थळी येऊन केला पंचनामा

वेंगुर्ले : म्हापण येथील एका २७ वर्षीय युवकाने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.हा प्रकार आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. सिद्धेश भास्कर म्हापणकर ( रा.चव्हाणवाडी ) , असे त्या युवकाचे नाव आहे. दरम्यान याबाबतची खबर मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत .

याबाबत अधिक माहिती अशी की , संबंधित युवक हा बांदा येथील एका हॉटेलमध्ये कामाला होता.तेथून तो काल सकाळी अचानक आपल्या घरी परतला.आज सकाळी तो पुन्हा कामावर जाणार होता.

त्यासाठी त्याने आईला आपल्याला सकाळी उठविण्यास सांगितले होते.दरम्यान त्याला उठवण्यासाठी त्याची आई खोली पाशी गेली असता त्याने दरवाजा उघडला नाही.त्यामुळे तिने मागच्या बाजूने जाऊन खोलीत प्रवेश केला.

यावेळी तो गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आला.याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून त्याने नेमकी आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही.दरम्यान घटनेची माहिती मिळताच त्याच्या मित्रपरिवार मधून हळहळ व्यक्त केली जात आहे .

 

Web Title: Youth commits suicide in Mhapan!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.