शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

बंदुकीचा स्फोट होऊन युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 2:26 AM

कारिवडे गावठणवाडी येथील अभिजीत पोकळे हा घरातून एकटाच शिकारीला जात असे. त्याच्या शेताच्या आजूबाजूला गवेही मोठ्या प्रमाणात येतात. म्हणून शेत राखण्यासही तो जात असे.

सावंतवाडी : कारिवडे गावठणवाडी येथील अभिजीत रामचंद्र पोकळे (२८) हा युवक शिकारीसाठी गेला असताना त्याच्या हातातील बंदुकीचा स्फोट होऊन हाताला जखम झाली. तसेच बंदुकीच्या आतील छर्रे शरीराला लागून तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने येथील कुटीर रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री घडली.कारिवडे गावठणवाडी येथील अभिजीत पोकळे हा घरातून एकटाच शिकारीला जात असे. त्याच्या शेताच्या आजूबाजूला गवेही मोठ्या प्रमाणात येतात. म्हणून शेत राखण्यासही तो जात असे.शनिवारी रात्री ८.३० च्या सुमारास बंदूक घेऊन तो घरातून शिकारीसाठी निघून गेला होता. मात्र, काही वेळातच तो पुन्हा घरी आला. तेव्हा त्याचा हात रक्तबंबाळ झाला होता. त्याने आपल्या घरात येऊन भावाला लगेच रुग्णालयात चल असे सांगितले. त्यामुळे त्याला तातडीने त्याचा भाऊ एकनाथ हा रुग्णालयात घेऊन आला. त्याला सावंतवाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा रात्री १०.३० वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. पोलिसांनी त्याच्या भावाच्या माहितीनुसार तक्रार दाखल करून घेतली असून अधिक तपास सावंतवाडी पोलीस हेडकॉन्स्टेबल लोहकरे करीत आहेत.>एकटाच शिकारीला जाण्याची सवयअभिजीत याच्या शरीरावरही बंदुकीचा स्फोट झाला. बंदुकीचे छर्रे उडाल्याने त्याला जखमा झाला. याबाबत मृत अभिजीतचा भाऊ एकनाथने पोलिसांना माहिती दिली. यात आपल्या भावाला शिकारीस जाण्याची सवय होती. तो एकटाच शिकारीला जात असे. तसा तो शनिवारीही गेला होता. मात्र, काही वेळातच पुन्हा तो घरी आला तेव्हा त्याने बंदुकीचा स्फोट झाल्याचे आम्हाला सांगितले. त्यामुळे त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले, असे त्याने स्पष्ट केले.