नायलॉन मांजामुळे तरुण जखमी
By Admin | Updated: January 18, 2016 22:43 IST2016-01-18T22:42:28+5:302016-01-18T22:43:16+5:30
नायलॉन मांजामुळे तरुण जखमी

नायलॉन मांजामुळे तरुण जखमी
नाशिक : नायलॉन मांजाला बंदी असूनही शहरात त्याचा सर्रास वापर केला जात असल्याचे दिसून येत आहे. नायलॉन मांजामुळे वाहनचालक व पादचाऱ्यांना त्रास होत असून, जिवावर बेतेल, अशा घटना सुरूच आहेत. रविवार पेठ येथील रहिवासी सागर कुलकर्णी (२४) हे हिरावाडी येथून आपल्या दुचाकीवरून जात असताना अचानक मांजाच्या दोऱ्याने त्यांच्या गळ्याला वेढा पडला. यामुळे त्यांना गळ्याभोवती मोठी जखम झाली. अचानक झालेल्या या प्रकाराने कुलकर्णी यांचा गाडीवर तोल सुटून ते खाली पडले. त्यामुळे पायाला, हाताला खरचटले असून, गाडीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नायलॉन मांजाच्या वापरास संपूर्ण बंदी घालून वापरणाऱ्यास कडक शासन करावे, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत. (प्रतिनिधी)