शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्गनगरी येथे जागतिक योग दिन, ओंकार ध्वनीने योगाचे प्रात्यक्षिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 15:34 IST

सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत हा योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

ठळक मुद्देसिंधुदुर्गनगरी येथे जागतिक योग दिन उत्साहात साजराओंकार ध्वनीने योगाचे प्रात्यक्षिक सादरीकरण

सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे आज आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 7.30 ते 8.30 या वेळेत हा योग दिनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.

यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हरीश जगताप, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा कोषागार अधिकारी शिवप्रसाद खोत, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, लेखाधिकारी जगदाळे, योग प्रशिक्षक वैद्य सुविनय दामले, जिल्हा रुग्णालयातील योग प्रशिक्षक साधना गुरव, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांच्यासह जिल्हा मुख्यालयातील शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.अतिरिक्त जिल्हाधिकारी मंगेश जोशी यांनी उपस्थितांना योगाचे महत्व सांगून योग दिना निमित्त शुभेच्छा दिल्या. तर योग प्रशिक्षक वैद्य सुविनय दामले यांनी योग हे अनुभवण्याचे शास्त्र असून प्रत्येकाने प्रामाणिकपणे योग केल्यास दैनंदिन जीवनामध्ये येणारा कामाचा ताण कमी करण्यास व शरीर निरोगी राखण्यास मदत होते असे प्रतिपादन केले.यावेळी वैद्य सुविनय दामले यांनी योगासनाची विविध प्रात्यक्षीके दाखवली व मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी ओंकार ध्वनीने योग प्रात्यक्षिकांची सुरुवात केली. त्यानंतर सुक्ष्म योगाचे प्रकार दाखविले, त्यानंतर त्यांनी वृक्षासन, समांतर चक्रासन, त्रिकोणासन, ताडासन, उष्ट्रासन, अर्धउष्ट्रासन, वज्रासन, कपालभाती, भ्रमरी, उतानपादासन, अर्धहलासन, हलासन, प्राणायम , पवनमुक्तासन, नवकासन, गरुडासन व सर्वात शेवटी शवासनाची प्रात्यक्षिक दाखवली. या प्रात्यक्षिक सादरीकरणामध्ये त्यांना साधना गुरव यांनी साथ दिली.सुरुवातील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांनी प्रास्ताविकात योग दिनाचे व योगाचे महत्व सांगितले. यावेळी स्काऊट गाईड चे विद्यार्थी व शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टॅग्स :Yogaयोगsindhudurgसिंधुदुर्ग