शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सावंतवाडीत जागतिक नारळ दिन, प्रमोद कुरियन यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2018 15:32 IST

नारळ विकास बोर्ड ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा श्रीफळ उत्पादक संघ यांच्यावतीने जागतिक नारळ दिन कार्यक्रम २ सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथे होणार असल्याची माहिती नारळ विकास बोर्डाचे प्रमोद कुरियन यांनी दिली.

ठळक मुद्देसावंतवाडीत जागतिक नारळ दिन, प्रमोद कुरियन यांची माहिती २ सप्टेंबरला विविध कार्यक्रम

सावंतवाडी : जिल्ह्यात नारळ लागवड क्षेत्र वाढण्याबरोबरच येथील शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ कसा मिळवून देता येईल याकरिता नारळ विकास बोर्ड ठाणे आणि सिंधुदुर्ग जिल्हा श्रीफळ उत्पादक संघ यांच्यावतीने जागतिक नारळ दिन कार्यक्रम २ सप्टेंबर रोजी सावंतवाडी येथे होणार असल्याची माहिती नारळ विकास बोर्डाचे प्रमोद कुरियन यांनी दिली.यावेळी नारळ विकास बोर्डाचे शरद आगलावे, श्रीफळ उत्पादक संघाचे रामानंद शिरोडकर, रणजित देसाई आदी उपस्थित होते. कोकणातनारळाला पोषक वातावरण आहे. मात्र त्यादृष्टीने नारळाची लागवड होताना दिसून येत नाही.

शासनाच्या कृषी विभागाकडूनही वेगवेगळ््या योजना उपलब्ध आहेत. मात्र त्याची अंमलबजावणी स्थानिक पातळीपर्यंत न झाल्याने या योजना म्हणाव्या तशा प्रत्यक्षात उतरल्या नाहीत. त्यासाठी भविष्यात कृषी विभागाने पुढाकार घ्यावा, असे कुरियन यांनी सांगितले.पालकमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, नारळ विकास बोर्डाचे राजाभाऊ लिमये, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुरेश गवस, नगराध्यक्ष बबन साळगावकर उपस्थित राहणार आहेत. जिल्ह्यातील सर्व नारळ उत्पादक तसेच सावंतवाडी दोडामार्ग, कुडाळ, वेंगुर्ले, देवगड येथील नारळ उत्पादक हितवर्धक क्लस्टरमधील लाभार्थी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रामानंद शिरोडकर यांनी केले.नारळ लागवड क्षेत्र वाढविण्यावर भरजिल्ह्यात चांदा ते बांदा योजनेतून केरळच्या धर्तीवर निरो प्रकल्प सुरू करण्याच्या हालचाली आहेत. मात्र त्यासाठी तत्त्वत: मान्यता अद्याप मिळाली नाही. जागतिक नारळ दिनाच्या निमित्ताने या ठिकाणच्या शेतकऱ्यांना विविध योजनांबरोबरच नारळावर येणाऱ्या रोगांचे संकट कसे दूर करता आले पाहिजे याच्या मार्गदर्शनासह नारळाला दर मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. शिवाय येथील नारळ लागवड क्षेत्र वाढण्यावर आमचा भर राहणार आहे, असे ते म्हणाले.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्ग