शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी शाखा कालव्याच्या कामगाराची आत्महत्या, रोणापालमधील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 19:30 IST

तिलारी शाखा कालव्याच्या रोणापाल (पुरणी) येथील साईटवर काम करणाऱ्या मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. सौरभ समीर अधिकारी (२०, रा. कलकत्ता, सध्या रा. रोणापाल) असे त्या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे.

ठळक मुद्देकामगाराची आत्महत्या, रोणापालमधील घटना तिलारी शाखा कालव्याचा कामगार

बांदा : तिलारी शाखा कालव्याच्या रोणापाल (पुरणी) येथील साईटवर काम करणाऱ्या मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. सौरभ समीर अधिकारी (२०, रा. कलकत्ता, सध्या रा. रोणापाल) असे त्या परप्रांतीय कामगाराचे नाव आहे.प्राथमिक चौकशीत तेथील कामगार विसंगत माहिती देत होते. त्यामुळे ही आत्महत्या की घातपात असा संशयही स्थानिकांनी व्यक्त केला आहे. बांदा पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सायंकाळी उशिरा पंचनामा केला. मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनास आणण्यात आला. शवविच्छेदनानंतर नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.मृत सौरभ हा परप्रांतीय कामगार असल्याने आत्महत्येचे कारण अजून समजू शकले नाही, असे पोलिसाकडून सांगण्यात आले.रोणापाल (पुरणी) येथून जाणाऱ्या कालव्याचे काम सुरू आहे. या कामासाठी मुकादमाने कलकत्त्याहून १२ कामगार आणले होते. मंगळवारी सौरभ याने गावाला जातो असे सांगितले. त्यावेळी मुकादमाने बुधवारी दुपारनंतर कामाचा हिशोब करतो. त्यानंतर तुम्ही गावी जा असे त्याा सांगितले होते.परंतु मंगळवारी गावी जाणार असा हट्ट त्याने धरला होता. बुधवारी सकाळी तेथील स्थानिक व्यक्तीने पुरणी येथे एक कामगार झाडाला गळफास लावल्याच्या स्थितीत असल्याचे सांगितले. त्यानंतर सोबत असलेल्या दोघांनी जाऊन खातरजमा केली असता तो सौरभ असल्याचे स्पष्ट झाल्याची माहिती सहकारी कामगार नारायण पाल यांनी दिली.याची माहिती त्यांनी मुकादमाला दिली व मुकादमाने बांदा पोलिसांना कळविले. याबाबतचा अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत.बांदा आरोग्य केंद्रात मृतदेहाचे विच्छेदनसायंकाळी उशिरा बांदा पोलीस निरीक्षक अनिल जाधव, पी. एस. माने, चि. टी. कोळेकर यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला. मृतदेह बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात विच्छेदनास आणण्यात आला. याबाबतचा अधिक तपास बांदा पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग