शहरं
Join us  
Trending Stories
1
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
2
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
3
दिवाळीनिमित्त राहुल गांधी पोहोचले मिठाईच्या दुकानात, स्वत: बनवली इमरती आणि बेसनाचे लाडू
4
EDला सापडले २५० पासपोर्ट, ७ पाकिस्तानी नागरिकांचा शोध सुरू, बंगाल कनेक्शन समोर   
5
"गेल्या १० वर्षात साबणाला हातही लावला नाही"; बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं 'बाथरूम सीक्रेट'
6
१५ वर्षांनी लहान पुतण्यावर जडला २ मुलांच्या आईचा जीव; नकार देताच पोलिसांसमोर भयंकर कृत्य
7
दिवाळीच्या फटाक्यांमुळे कार किंवा बाइकला आग लागली तर इन्शुरन्स क्लेम करू शकता का? जाणून घ्या
8
Sanjay Nirupam: "राज ठाकरेंनी नवा छंद जोपासलाय, ते...", संजय निरुपम नेमकं काय बोलून गेले? पाहा
9
"युद्ध थांबवण्याची खरी वेळ...!" रशिया-युक्रेन युद्धावर झेलेंस्की यांचं मोठं विधान
10
Diwali Bonus: मुंबई विमानतळावरील कामगारांची दिवाळी दणक्यात, मिळाला 'इतका' बोनस!
11
Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
12
चीनचा अमेरिकेला आणखी एक झटका; ७ वर्षात पहिल्यांदा असं काही घडलं, डोनाल्ड ट्रम्प चिंतेत पडले
13
OLA कंपनीतील कर्मचाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, २८ पानी अखेरची चिठ्ठी सापडली; मालकावर FIR दाखल
14
पुढच्या वर्षी 1.60 लाखपर्यंत पोहोचू शकतं सोनं; चांदी कितीपर्यंत वधारणार? जाणून डोळे फिरतील!
15
टायर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं घेतला रॉकेट स्पीड, q2 च्या रिझल्टने गुंतवणूकदार खुश!
16
Bihar Election 2025: लालूंच्या राजदची यादी आली! काँग्रेसविरोधात तीन जागांवर उमेदवार दिले, तेजस्वी यादव राघोपूरमधून लढणार...
17
दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Nifty २५,८४३ वर बंद, उद्या मुहूर्त ट्रेडिंग
18
Manu Garg : करून दाखवलं! आठवीत असताना गमावली दृष्टी, आईच्या साथीने रचला इतिहास, झाला अधिकारी
19
पाण्याच्या पाटावरून वाहिले रक्ताचे पाट, भीषण गोळीबार, २ जणांचा मृत्यू, ३ जखमी 
20
मेडिकल कॉलेजमध्ये MBBS च्या जागा वाढल्या, आता एवढ्या विद्यार्थ्यांना मिळणार प्रवेश, महाराष्ट्रात किती वाढल्या?

कणकवलीतील उड्डाणपूलाचे काम रखडले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 17:45 IST

मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामांतर्गत कणकवली शहरात उभारण्यात येणारा उड्डाणपूल ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला होईल. असे आश्वासन दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीकडून दिले होते. मात्र, सद्य:स्थितीत हा उड्डाणपूल निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची आशा धूसर झाली आहे.

ठळक मुद्देऑक्टोबरमध्ये वाहतुकीस खुला होण्याची चिन्हे धूसर ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणा वारंवार उघड

सुधीर राणे कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरण कामांतर्गत कणकवली शहरात उभारण्यात येणारा उड्डाणपूल ऑक्टोबर महिन्यात पूर्ण होऊन तो वाहतुकीस खुला होईल. असे आश्वासन दिलीप बिल्डकॉन या ठेकेदार कंपनीकडून पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतलेल्या चौपदरीकरण कामाच्या आढावा बैठकीत दिले होते. मात्र, सद्य:स्थितीत त्या कामाचा दर्जा व स्थिती पाहिली असता हा उड्डाणपूल निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची आशा धूसर झाली आहे. तर वेळोवेळी अनेक प्रसंगातून ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणाच समोर येत आहे.कणकवली येथील विजय भवनच्या सभागृहात महामार्ग कामाची आढावा बैठक पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली २१ मे रोजी झाली होती. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, कोकण सिंचन मंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, संजय पडते,अतुल रावराणे,प्रांताधिकारी वैशाली राजमाने,तहसीलदार आर.जे.पवार,महामार्ग प्राधिकरण अधिकारी व विविध विभागाचे अधिकारी, ठेकेदार कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.यावेळी गडनदी ते जानवली नदी उड्डाण पूल वाहतुकीसाठी कधी खुला होणार ? याबाबत कणकवलीवासीयांच्यावतीने संदेश पारकर यांनी ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली होती. त्यावेळी कणकवलीतील उड्डाण पूल ऑक्टोबर मध्ये वाहतूकीस खुला होईल.असे दिलीप बिल्डकाँनचे गौतमकुमार यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर कणकवली एस.एम. हायस्कूल नजीक बॉक्सेलच्या भिंतीला भगदाड पडले. त्यामुळे कणकवली वासीयांनी आंदोलन करावे लागले. तर सामाजिक कार्यकर्त्यांना न्यायालयात धाव घ्यावी लागली.

बॉक्सेल ऐवजी पूर्ण पिलर घालून उड्डाणपुलच करा अशी मागणी आता पुढे आली आहे. त्यासाठी भाजपचे प्रदेश सचिव माजी आमदार प्रमोद जठार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्यासह आपल्या पक्षातील इतर नेत्यांच्या सोबत केंद्रिय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे प्रयत्न करीत आहेत. खासदार विनायक राऊत यांनीही या मागणीला पाठींबा दर्शविला आहे. या मागणीला यश यावे अशी कणकवलीवासीयांची इच्छा आहे.शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळील उड्डाणपुलाचे काम सुरू असताना ३१ जुलै रोजी तेथील स्लॅबचा काही भाग कोसळला. त्यामुळे परत कणकवलीवासीय आक्रमक झाले. ठेकेदार कंपनीचा हलगर्जीपणा वारंवार उघड होत असल्याने दुर्घटना घडून जीवितहानी होवू नये यासाठी गणेशोत्सव होईपर्यंत उड्डाणपुलाचे काम बंद ठेवण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या काम बंद आहे.त्यानंतर उबाळे मेडीकल जवळ उड्डाणपुलाच्या खाली सर्व्हिस रोड लगत सुरक्षिततेसाठी उभा केलेला एक पत्रा ४ ऑगस्ट रोजी चारचाकी गाडीवर पडला. मात्र, चालकाच्या प्रसंगावधानाने मोठी दुर्घटना टळली. ठेकेदार कंपनीने सुरक्षिततेची व्यवस्थित काळजी न घेतल्याने अशा दुर्घटना वरचेवर घडत आहेत. त्यामुळे कामाला विलंब होत आहे. त्यात सध्या पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे कामगारांना काम करताना अडचणी येत आहेत. यासर्व पार्श्वभूमीवर उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.तीन वर्षाहून अधिक काळ महामार्ग चौपदरीकरणाचे काम सूरु आहे. त्यामुळे फार मोठी गैरसोय होत असून कणकवलीवासीय आता या कामाला कंटाळले आहेत. केव्हा एखदा हे काम पूर्ण होते आणि आपली वारंवार उदभवणाऱ्या समस्यांपासून सुटका होते. असे त्याना झाले आहे. त्यामुळे शासन आणि प्रशासन यांनी वेळीच याकडे लक्ष देऊन महामार्ग चौपदरीकरण कामामुळे निर्माण झालेल्या समस्येतून नागरिकांची सुटका करावी. अन्यथा नागरिकांच्या तीव्र आंदोलनाला आता त्यांना लवकरच सामोरे जावे लागेल.महामार्ग समस्यांप्रकरणी उपोषण !महामार्ग चौपदरीकरणामुळे उदभवलेल्या समस्या दूर व्हाव्यात यासाठी कणकवली वासीयांनी विविध प्रकारची आंदोलने केली आहेत. वयोवृद्ध नागरिकांनी उपोषणही केले होते. तर महामार्ग प्राधिकरणच्या उपभियंत्यांवर चिखलफेकही झाली होती. आता परत काँग्रेसचे कणकवली तालुकाध्यक्ष प्रदीप मांजरेकर यांनी प्रांताधिकारी कार्यालया समोर उपोषण सुरू केले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्ताना शासनाकडून आता तरी न्याय मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

टॅग्स :highwayमहामार्गsindhudurgसिंधुदुर्गKankavliकणकवली