महिला, पुरुष गटाच्या कुस्ती स्पर्धां

By Admin | Updated: November 16, 2014 23:53 IST2014-11-16T21:16:11+5:302014-11-16T23:53:58+5:30

शनिवार दि. २२ रोजी दुपारी २ वाजता भाई विलणकर जिम व उत्कर्ष मित्रमंडळ, शांतीनगर, नाचणेरोड, रत्नागिरी येथे

Women, men's wrestling competitions | महिला, पुरुष गटाच्या कुस्ती स्पर्धां

महिला, पुरुष गटाच्या कुस्ती स्पर्धां

रत्नागिरी : जिल्हा कुस्ती असोसिएशनच्या वतीने जिल्ह्यातील वरीष्ठ गट गादी व माती, कुमारगट, महिलागट व ग्रिको रोमन जिल्हा अजिंक्यपदाच्या कुस्ती स्पर्धा शनिवार दि. २२ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता भाई विलणकर जिम व उत्कर्ष मित्रमंडळ, शांतीनगर यांचे संयुक्त विद्यमाने, भवानी मंडप, शांतीनगर, नाचणेरोड, रत्नागिरी येथे घेण्यात येणार आहेत.
यासाठी कुमार कुस्तीगीरांचे वय १७ वर्षेपर्यंत असणे आवश्यक असून दिनांक १ जानेवारी १९९८ पासून पुढे जन्मलेल्या कुमार कुस्तीगीरांना स्पर्धेत भाग घेता येईल. यासाठी जन्मतारखेचा रत्नागिरी जिल्ह्यातील शाळेचा, महाविद्यालय, ग्रामपंचायत, नगर परिषद जन्मदाखला मुळप्रतीमध्ये आणणे आवश्यक आहे. तसेच वरीष्ठ गट कुमारगट, महिलागट व ग्रिको रोमन गट कुस्तीगीरांचे वास्तव्य रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असणे आवश्यक आहे. त्यासाठी रेशनकार्ड किंवा जन्मदाखला पुराव्यासाठी मुळप्रतीत आणणे आवश्यक आहे. वास्तव्याबाबत शंका आल्यास किंवा तक्रार आल्यास असोसिएशनचा निर्णय अंतिम राहिल.
तरी कुस्तीगीरांनी खेळण्याच्या गणवेशासह दिनांक २३ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता भवानी मंडप, शांतीनगर, नाचणेरोड, रत्नागिरी उपस्थित रहावे. तेथे आपले प्रवेश अर्ज स्वीकारले जातील. वरीष्ठ गट राज्यस्पर्धा नाशिक जिल्हा, कुमारगट राज्यस्पर्धा पुणे जिल्हा येथे होणार आहेत.
वरीष्ठ गट कुस्ती स्पर्धेसाठी वजन गट ५५ किलो, ६० किलो, ६६ किलो, ७४ किलो, ८४ किलो, ९६ किलो व ८४ ते १२० किलोपर्यंत. महिला कुस्ती स्पर्धेसाठी वजन गट ४८ किलो, ५१ किलो, ५५ किलो, ५९ किलो, ६३ किलो, ६७ किलो व ७२ किलोपर्यंत, महाराष्ट्र केसरीगट कुमार कुस्तीगीर स्पर्धेसाठी वजन गट पुढीलप्रमाणे आहे. ४२ किलोपर्यंत, ४६ किलो, ५० किलो, ५४ किलो, ५८ किलो, ६३ किलो, ६९ किलो, ७६ किलो, ७६ ते १०० किलो असे आहेत. अधिक माहितीसाठी अध्यक्ष श्रीकृ ष्ण विलणकर, कार्यवाह सदानंद जोशी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Women, men's wrestling competitions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.