महिला पत्रकारांवर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
By Admin | Updated: November 12, 2014 22:52 IST2014-11-12T21:22:26+5:302014-11-12T22:52:56+5:30
आपल्या जिल्ह्यात असा प्रकार कदापिही घडणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासन घेईल,

महिला पत्रकारांवर हल्ला; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी : दोन महिला पत्रकारांवर हल्ला केल्याप्रकरणी आज येथील पत्रकारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून निषेध व्यक्त केला. दि. ७ रोजी पनवेल येथील महिला पत्रकार चेतना वावेरकर या कार्यालयात जात असताना त्यांची गाडी थांबवून त्यांना मारहाण करण्यात आली होती. तसेच पिंपरी चिंचवडच्या महिला पत्रकार अश्विनी सातव - डोके यांच्या घरावर दगडफेक केली. या दोन्ही महिला पत्रकारांवर केलेल्या भ्याड हल्ल्याचा येथील सर्व पत्रकारांनी निषेध केला असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. तशा आशयाचे निवेदन शासनाकडे देण्यासाठी आज जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्याकडे निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी आपल्या जिल्ह्यात असा प्रकार कदापिही घडणार नाही, याची दक्षता जिल्हा प्रशासन घेईल, असे सांगतानाच असा कुठलाही अनुचित प्रकार आढळून आल्यास त्याबाबत पहिल्यांदा तक्रार होणे गरजेचे असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)