वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाणाऱ्या महिलेला मृत्यूने कवटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 14:59 IST2020-07-15T14:58:41+5:302020-07-15T14:59:00+5:30
वडिलांचे अंत्यदर्शन झालेच नाही आणि मुलीचाही मृत्यू झाल्याने दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली आहे.

वडिलांच्या अंत्यसंस्काराला जाणाऱ्या महिलेला मृत्यूने कवटाळले
वेंगुर्ला : परुळे येथे वडिलांच्या अंत्ययात्रेला येत असताना मालवण तालुक्यातील बिळवस गावच्या सरपंच रूपाली रामचंद्र नाईक (४५) यांचे अपघाती निधन झाले. परुळे येथील आपल्या घरी वडील पुरुषोत्तम परुळेकर यांच्या अंत्ययात्रेला त्या येत असताना दुचाकीचा चिपी विमानतळानजीक अपघात झाला. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. नाईक यांचा मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. वडिलांचे अंत्यदर्शन झालेच नाही आणि मुलीचाही मृत्यू झाल्याने दोन्ही गावांमध्ये शोककळा पसरली आहे.