संघटनेचे उपक्रम स्तुत्यच
By Admin | Updated: January 29, 2015 23:32 IST2015-01-29T21:58:26+5:302015-01-29T23:32:56+5:30
विजयकुमार वळंजू : तळेरे येथील आदर्श व्यापारी संघटनेचा वर्धापनदिन

संघटनेचे उपक्रम स्तुत्यच
तळेरे : तळेरे येथील आदर्श व्यापारी संघटनेच्या विविध कार्यक्रमांतून नेहमीच एकता दिसते. वर्षभर ग्राहकांना सेवा देतानाच विविध उपक्रम राबविले जातात, तेही स्तुत्य आणि अनुकरणीयच आहे, असे मत जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजयकुमार वळंजू यांनी व्यक्त केले. तळेरे येथील आदर्श व्यापारी संघटनेचा वर्धापनदिन व पुरस्कार वितरण कार्यक्रमात वळंजू बोलत होते.यावेळी श्रावणशेठ बांदिवडेकर, ज्येष्ठ व्यापारी शांतिनाथ लडगे, जिल्हा व्यापारी महासंघाचे कार्यवाह महेश नार्वेकर, कणकवली तालुकाध्यक्ष विशाल कामत, तळेरे सरपंच दर्शना बांदिवडेकर, उपसरपंच शशांक तळेकर, तळेरे व्यापारी संघटना अध्यक्ष चंद्रशेखर डंबे, सेक्रेटरी राजेंद्र पिसे, चंद्रकांत तळेकर, बाबा भांबुरे, जिल्हा व्यापारी महासंघाचे सदस्य राजू जठार, दादा पिसे, सुरेश डंबे, दीपक जठार, संतोष कल्याणकर, वासुदेव वाडेकर, दादा महाडिक, आदी उपस्थित होते.
वळंजू म्हणाले, तळेरेच्या आदर्श व्यापारी संघटनेचे कार्य आदर्शवत आहे. विविध सामाजिक उपक्रमांतून याचे प्रतिबिंब दिसून येते. ऋयावेळी आयोजित हळदी-कुंकू समारंभाला दशक्रोशीतील सुमारे दोन हजार महिलांनी उपस्थिती दर्शविली.
व्यापारी संघटनेच्या वर्धापन
दिनानिमित्त सकाळी सत्यनारायणाची महापूजा, तळेरे येथील बुवा संतोष तळेकर, बुवा राजू वळंजू यांची सुश्राव्य भजने, रात्री श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, कासार्डेचे बुवा मंगेश खाडये व श्री मालोबा प्रासादिक भजन मंडळ पाळेकरवाडीचे बुवा दीपक पाळेकर यांच्या ट्वेंन्टी-२० डबलबारी भजनाचा जंगी सामना झाला.
तळेरे तालुका व्हावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. त्यासाठी आवश्यक पाठपुरावा केला जाईल. तळेरे व्यापारी संघटनेच्यावतीने त्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल. यावेळी लवकरात लवकर नवीन तळेरे तालुका होण्याबाबतचा निर्धार केला गेला.
तळेरे येथील भजनी बुवा संतोष तळेकर यांच्यासह अनेक बुवांना ज्यांनी घडविले, असे भजनसम्राट गुणाजी पाळेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अमोल सोरप, दत्तात्रय कल्याणकर, राकेश तळेकर, सुरेश तळेकर, समीर चव्हाण, अरविंद मुद्राळे, शिवसेना तालुका उपाध्यक्ष शरद वायंगणकर, प्रसाद कल्याणकर, बाजारपेठ मित्रमंडळाचे अध्यक्ष उल्हास कल्याणकर, कासार्डे व्यापारी
संघटनेचे अध्यक्ष श्रीपत पाताडे, संजय नकाशे, प्रवीण पोकळे, कासार्डे सरपंच संतोष पारकर, उपसभापती संतोष कानडे, पंचायत समिती सदस्य संजय देसाई, ओझरम सरपंच प्रदीप राणे, व्यापारी संघटनेचे सर्व सभासद, तसेच रिक्षा, टेम्पो, सलून संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. विजय शेलार यांनी मिमिक्री सादर केली. राजू माळवदे यांनी सूत्रसंचालन केले. (वार्ताहर)
कै. दत्तात्रय तुकाराम जठार स्मृती यशस्वी उद्योजक पुरस्कार तळेरे येथील ज्येष्ठ व्यापारी बाप्पा पटेल यांना जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विजयकुमार वळंजू यांच्या हस्ते देण्यात आला. जिल्हा व्यापारी महासंघाचे सदस्य राजू जठार यांनी हा पुरस्कार पुरस्कृत केला असून, गेली सात वर्षे हा पुरस्कार आदर्श व्यापारी संघटना तळेरेच्यावतीने देण्यात येतो.