वायंगणीत भरणार कासव जत्रा
By Admin | Updated: January 2, 2015 00:23 IST2015-01-01T21:30:00+5:302015-01-02T00:23:16+5:30
सलग चौथे वर्ष : किरात ट्रस्टतर्फे आयोजन

वायंगणीत भरणार कासव जत्रा
प्रथमेश गुरव - वेंगुर्ले किरात ट्रस्टतर्फे व वायंगणी- वेंगुर्ले ग्रामस्थांच्या सहकार्याने ३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत सलग चौथ्या वर्षी कासव जत्रेचे आयोजन केले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी ही कासवजत्रा आकर्षणाचा केंद्रबिंदू बनणार आहे.
आॅलिव्ह रिडले ही कासवांची दुर्मीळ प्रजाती देशात ओडिशा, गोवा आणि कोकणात आढळते. त्यांची पैदास डिसेंबर ते मार्च या कालावधीत होते. त्यानिमित्ताने मऊशार वाळूवर स्वच्छंदीपणे धावणारी कासवांची पिल्ले, समुद्राच्या लाटांवर हेलकावे घेण्यासाठी सुरू असलेली त्यांची पळापळ या कासवांच्या विविध लिलांचे दर्शन ‘याची देही याची डोळा’ घेण्याची संधी निसर्गप्रेमी पर्यटकांना यामुळे उपलब्ध होणार आहे.
कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी गावच्या कासव जत्रेची तारीख जाहीर झाली आहे.
३० जानेवारी ते १ फेब्रुवारी या दरम्यान वायंगणीच्या समुद्र किनाऱ्याच्या आॅलिव्ह रिडले कासवांच्या पिलांची फलटण समुद्राकडे परतताना पाहता येईल.
सुहास तोरसकरांचा अनोखा उपक्रम
दरवर्षी नोव्हेंबर ते मार्च महिन्यात ही कासवं किनाऱ्यावर येऊन अंडी घालतात. या अंड्यांपासून बनविलेल्या पदार्थांना पंचतारांकित हॉटेल्समध्ये खूप मागणी असते. त्यामुळे अंडी चोरीला जाऊ नयेत, तसेच कुत्रे किंवा अन्य प्राण्यांपासून त्यांचे भक्षण होऊ नये, म्हणून सुहास तोरसकर आणि त्यांचे सहकारी या अंड्यांची विशेष काळजी घेतात. अंडी ज्या ठिकाणी घातली आहेत, तिथे जाळं बसवतात आणि ५५ ते ६० दिवसांनी पिल्लं बाहेर आल्यावर त्यांना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली समुद्रात सोडलं जातं.
जत्रेत कोकणी मेव्याची मेजवानी
३० जानेवारी ते १ फेब्रुवारी दरम्यान यंदा पिल्लं बाहेर येतील, असा अंदाज कासव अभ्यासकांनी वर्तविला आहे. कासव दर्शनासह या कासव जत्रेत वायंगणी किनाऱ्यावरची डॉल्फिन सफर, खाडीतील मासेमारीचा अनुभव, वायंगणी- कोंडुरा जंगल ट्रेल, कासव संवर्धनाचे फिल्म- शो, पाणी- पक्षी तज्ज्ञांशी गप्पा, दशावतार खेळ, अस्सल मालवणी पदार्थांची मेजवानी असे कार्यक्रम या कासव जत्रेच्या निमित्ताने आयोजित केले आहेत. या कासव जत्रेत सहभागी होण्यासाठी शशांक मराठे किंवा ‘्र१ं३३१४२३@ॅें्र’.ूङ्मे या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.