फ्रेंडशिप चेंदवण संघाला विजेतेपद

By Admin | Updated: January 14, 2015 00:30 IST2015-01-13T23:06:15+5:302015-01-14T00:30:37+5:30

वैभववाडी चषक क्रिकेट स्पर्धा : वेंगुर्लेच्या रोहित स्पोर्टला उपविजेतेपद

Winners of Friendship Chess team | फ्रेंडशिप चेंदवण संघाला विजेतेपद

फ्रेंडशिप चेंदवण संघाला विजेतेपद

वैभववाडी : येथील दत्तकृपा प्रतिष्ठान आयोजित वैभववाडी चषक २०१५ चा फ्रेंडशिप चेंदवण संघ विजेता ठरला तर उपविजेत्या वेंगुर्लेच्या रोहित स्पोर्ट्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते विजेत्या चेंदवण संघाला रोख ३५ हजार ५५५ रुपये व वैभववाडी चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
माजी आमदार प्रमोद जठार पुरस्कृत दत्तकृपा प्रतिष्ठानने वैभववाडी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. पारितोषिक वितरण समारंभाला भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रमोद रावराणे, तालुका सरचिटणीस राजेंद्र राणे, संजय रावराणे, जिल्हा बँकेचे माजी संचालक सज्जन रावराणे, संजय लोके, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय माईणकर, उपाध्यक्ष जयेंद्र कोलते, राकेश कुडतरकर, सचिव संकेत माईणकर, खजिनदार अमेय पोरे, ज्येष्ठ नागरिक अण्णा माईणकर, शांताराम माईणकर, शिवराम माईणकर, तंटामुक्ती अध्यक्ष रणजित तावडे, संतोष माईणकर आदी उपस्थित होते.
अंतिम सामन्याच्या नाणेफेकीचा कौल जिंकून रोहित स्पोटर््सने क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रथम फलंदाजी करताना फ्रेंडशिप चेंदवण संघाने ८ षटकात ६० धावसंख्या उभारली. या धावसंख्येचा पाठलाग करताना रोहित स्पोटर््सचा डाव ४५ वर संपुष्टात आला. स्पर्धेचा अंतिम सामना चुरशीचा न झाल्याने क्रीडारसिकांचा काहीसा हिरमोड झाला.
उपविजेत्या रोहित स्पोटर््सला रोख २२ हजार २२२ व चषक देण्यात आला. याखेरीज मालिकावीर किरण परब, सामनावीर संजू फर्नांडिस, उत्कृष्ट फलंदाज गोपाळ बट्टा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक जॉनी डिसूजा (सर्व फ्रेंडशिप चेंदवण), उत्कृष्ट गोलंदाज गणेश कुबल (रोहित स्पोटर््स वेंगुर्ला) यांना रोख पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. स्पर्धेसाठी पंच म्हणून सुहास चव्हाण, मनोज सुतार यांनी काम पाहिले तर समीर पांढरे, अशोक नाईक यांनी समालोचन केले. गुणलेखक म्हणून दत्तराज साटम, हेमंत माईणकर, आशिष गुरव, भाग्येश पेडणेकर यांनी कामगिरी पार पाडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी समीर माईणकर, आकाश कानडे, दिलीप पाटील, नितेश पाटील, रोहन कुडतरकर, नवनाथ गुरव, अवधूत माईणकर, सागर माईणकर आदींनी परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

विकासाची जबाबदारी माझी : जठार
मी आता आमदार नसलो तरी पूर्वी पाठपुरावा केलेले सर्व प्रकल्प पूर्णत्वाला नेण्यासाठी आणि विकासाचे नवे प्रकल्प तालुक्यात आणण्यासाठी केंद्र आणि राज्यातील सत्ता उपयोगात आणू. सत्तापक्षात असल्यामुळे वैभववाडीच्या विकासाची संपूर्ण जबाबदारी माझी आहे. तालुक्याच्या क्रीडा संकुलासाठी दत्तकृपा प्रतिष्ठानने पुढाकार घेऊन जागा उपलब्ध करून दिल्यास शासनाचा निधी मिळवून देऊ असे आश्वासन माजी आमदार प्रमोद जठार यांनी वैभववाडी चषकाच्या पारितोषिक वितरण समारंभात दिले.

Web Title: Winners of Friendship Chess team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.