शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दोषींवर कडक कारवाई करणार, सावंतवाडी कारागृहाची भिंत कोसळल्याने पालकमंत्र्यांनी दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 16:23 IST

चौकशीसाठी वरिष्ठ अधिकारी येणार 

सावंतवाडी : कारागृहाची इमारत हा ऐतिहासिक ठेवा होता. त्याला अनेक वर्षांपासून जपण्याचे काम करण्यात आले होते. पण तीन महिन्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यावर भिंत बांधली त्यामुळे संपूर्ण संरक्षक भिंत कोसळली ही गंभीर बाब आहे. बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी लवकरच पाहणी करून त्याचा अहवाल देतील त्यानंतरच खऱ्या अर्थाने दोषी कोण हे समोर येईल. पण कोणीही दोषी असूदे त्याला सोडणार नाही. कडक कारवाई केली जाईल असा इशारा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी दिला.मंत्री राणे यांनी शनिवारी सावंतवाडी कारागृहाला भेट देत पडलेल्या भितीची पाहणी केली. यावेळी पोलिस अधीक्षक डॉ.मोहन दहिकर, कारागृह अधीक्षक सतीश कांबळे, पोलिस उपअधीक्षक विनोद कांबळे, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, बांधकामचे वैभव सगरे आदी उपस्थित होते...तर कोणाचीही गय नाहीराणे म्हणाले, घडलेली घटना  ही दुर्दैवी आहे. मात्र लवकरच या इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल. त्यानंतर जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी देऊन त्या इमारतीला गतवैभव प्राप्त करून देण्यात येणार आहे, असा शब्द राणे यांनी दिला  त्यांनी सार्वजनिक बांधकामाच्या भूमिकेबाबत ही तीव्र नाराजी व्यक्त केली. भिंतीवर भिंत बांधताना ते बांधकाम टिकेल का? याचा अभ्यास होणे गरजेचे होते. फक्त बिले काढण्यासाठी जर हे काम झाले असेल तर कोणाचीही गय केली जाणार नाही. 

जिल्हा नियोजनातून निधी देणारभविष्यात उर्वरित बांधकामामुळे बांधकामाला कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी या कारागृहाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. असे राणे म्हणाले,