शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग  जिल्ह्यात राडेबाजीची संस्कृती चालू देणार नाही : वैभव नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 12:34 IST

राडेबाजी हाच स्वाभिमान पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. मात्र राडेबाजीची संस्कृती जिल्ह्यात आम्ही चालू देणार नाही. कुठेही दहशत निर्माण केली गेली तर त्याविरोधात आम्ही उभे रहाणार असल्याचा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी येथे व्यक्त केला.

ठळक मुद्देसिंधुदुर्ग जिल्ह्यात राडेबाजीची संस्कृती चालू देणार नाही : वैभव नाईकनलावडे-पारकर गटातील हाणामारीनंतर नाईक यांची पत्रकार परिषद

कणकवली : राडेबाजी हाच स्वाभिमान पक्षाचा एकमेव अजेंडा आहे. मात्र राडेबाजीची संस्कृती सिंधुदुर्ग जिल्ह्यात आम्ही चालू देणार नाही. कुठेही दहशत निर्माण केली गेली तर त्याविरोधात आम्ही उभे रहाणार असल्याचा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांनी येथे व्यक्त केला.कणकवलीत झालेल्या नलावडे-पारकर गटातील हाणामारीनंतर आमदार नाईक यांनी येथील विजय भवनमध्ये गुरुवारी पत्रकार परिषद घेतली.यावेळी आमदार नाईक म्हणाले, कणकवली नगरपंचायत निवडणुकीत राणे पितापुत्रांनी विकासाचा नारा दिला होता. मात्र निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यात त्यांच्या पक्षाचे नगराध्यक्ष कणकवली शहरातून दांडे घेऊन फिरत आहेत.

दुसरे एक नगरसेवक आपल्या फ्लॅटधारकांना गोळीबार करून धमकावत आहेत. नुकतेच स्वाभिमान शहराध्यक्षपदी विराजमान झालेले घरातून भाडेकरुना बाहेर काढत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग वासियाना त्यांची संस्कृती दिसून आली आहे.राणेंच्या कार्यकर्त्यांच्या याच राडेबाजीमुळे त्यांना कुठला पक्ष जवळ करीत नाही. आता सिंधुदुर्ग जिल्हयापुरता मर्यादीत असलेल्या स्वाभिमान पक्षाचा राडेबाजी हाच एकमेव अजेंडा राहिला आहे. तसेच स्वाभिमानचे कुठलेही पद घेतल्यानंतर राडेबाजी करायलाच हवी असे नूतन पदाधिकाऱ्यांच्या राडेबाजीतील सहभागावरुन दिसून येत आहे. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत स्वाभिमान पक्षाला सिंधुदुर्गवासीय स्वीकारणार नाहीत.कणकवली शहरात बसविलेले अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. ते सुरु करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. सीसीटीव्ही कॅमेरे असतील तर अशा घटनाना आळा बसेल. जिल्हा नियोजन मधून 20 लाखांचा निधी मंजूर झाला असुन कुडाळ आणि कणकवली येथे लवकरच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येतील .असेही यावेळी वैभव नाईक यांनी सांगितले.आम्ही दहशतवादाच्या विरोधात !यापूर्वीही अनेक वेळा शिवसेना दहशतवादाच्या विरोधात उभी राहिली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही दहशतीचा प्रकार झाला तर शिवसेना त्याविरोधात ठामपणे उभी रहाणार आहे. दहशतीचे वातावरण निर्माण करणारे कोणत्याही पक्षाचे असतील तर त्याला आमचा विरोध राहील. दहशत रोखण्यासाठीच जनतेने आम्हाला निवडून दिले आहे. असे यावेळी पत्रकारानी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरादरम्यान वैभव नाईक यानी सांगितले.

टॅग्स :Vaibhav Naikवैभव नाईक sindhudurgसिंधुदुर्ग