दहशतवादाविरोधात लढतच राहणार
By Admin | Updated: July 17, 2014 23:09 IST2014-07-17T23:04:17+5:302014-07-17T23:09:04+5:30
दीपक केसरकर : कुडाळात शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून स्वागत

दहशतवादाविरोधात लढतच राहणार
कुडाळ : शिवसेनेत प्रवेश करण्याचे जाहीर केल्यानंतर सिंधुदुर्गात आलेल्या आमदार दीपक केसरकर यांचे कुडाळात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. दहशतवादाच्या विरोधातील लढाई सुरुच राहणार असल्याचे प्रतिपादन यावेळी केसरकर यांनी केले.
आमदार केसरकर कुडाळात दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागताकरिता शिवसेनेचे पदाधिकारी व काही राष्ट्रवादीचे कार्यकर्तेही उपस्थित होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक, अभय शिरसाट, राजन नाईक यांनी दीपक केसरकर यांचे पुष्पहार घालून स्वागत केले. यावेळी उपसभापती बबन बोभाटे, महिला जिल्हाप्रमुख श्रेया परब, वर्षा कुडाळकर, पंचायत समिती सदस्य गंगाराम सडवेलकर, नितीन वाळके, सुशील चिंदरकर, नागेश नाईक, मंदार शिरसाट, रामदास शिरसाट यांच्यासह शिवसेनेचे आजी, माजी पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य संजय भोगटे, व्दारकानाथ घुर्ये, जीवन बांदेकर, हरीश घुर्ये उपस्थित होते.
स्वागतानंतर आमदार दीपक केसरकर यांची गांधी चौक ते शिवसेना कार्यालयापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली. (प्रतिनिधी)