शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कोड्यात का बोलता? सरळ उघड बोला; निलेश राणे यांचे रवींद्र चव्हाण यांना खुले आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 18:00 IST

बळीचा बकरा व्हायला काल परवा राजकारणात आलो नाही; भाऊ नितेश राणे यांच्याही वक्तव्याचा घेतला समाचार

संदीप बोडवेलोकमत न्यूज नेटवर्क

मालवण: 'दोन नंबर हा दोन नंबरचा राहणार' या रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यावर निलेश राणेंनी खरपूस समाचार घेतला. "ते असं का बोलत आहेत, मला माहिती नाही, मात्र त्यांनी दिलेला दाखला हा स्वर्गीय आर आर पाटलांचा आहे. त्यामुळे त्यांना आता काँग्रेसवाले आठवायला लागले आहेत. रवींद्र चव्हाणांमधील अनेक बदलांमध्ये एक वेगळा बदल बघितला", असा खरमरीत टोलाही राणे यांनी लगावला. 

राणे मालवण येथे माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल आदर आहे. दररोज रवींद्र चव्हाण कोडवर्डमध्ये धमकी देत आहेत, त्यांनी उघड धमकी द्यावी. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतो, त्यामुळे आपण बिनधास्त पणे बोललं पाहिजे. चव्हाण हे कोडवर्डमध्ये धमकी देत आहे, ती त्यांची घमेंड आहे. या महाराष्ट्रात मोठमोठ्यांची घमेंड उतरली. म्हणून आपण परिस्थिती आटोक्यात कशी आणायची ते पहा, बिघडवू नका. 

नेमका बकरा कोणाचा झाला हे तीन तारखेला कळेल. नितेश राणेंच्या कालच्या टीकेला उत्तर दिले. माझं नाव घेऊन पत्रकार परिषदेंना गर्दी करू नका. मी रवींद्र चव्हाण यांच्यावरच टीका करत आहे. त्यामुळे माझं नाव घेण्याचा अधिकार त्यांना आहे. मी तुमच्यावर काहीच बोललो नाही आणि बोलणार देखील नाही. मला माझ्या मर्यादा माहिती आहेत. आपण एक आहोत हे विसरून चालणार नाही. तीन तारीख नंतर पुन्हा एकत्रच यायचं आहे. जिल्ह्यात ज्या घटना सुरू आहेत त्यावर मी बोलत आहे मी वैयक्तिक टीका कुणावरही करत नाही. माझा बळीचा बकरा कोणी करायला लावलाय का? एवढा दूध खुळा आहे का? काल-परवा राजकारणात आलो नाही. मला जे चुकीचं वाटतं त्यावर बोलतो.

निलेश राणेंना एकाकी पाडलं जातं यात काही तथ्य नाही. काल दीपक केसरकर यांनी माझ्यासाठी वक्तव्य केलीत. एकाकी पडलो असतो, तर आज एवढा बोललो नसतो. एकटा माणूस एवढं सगळं बोलू शकतो का. तीन तारीखेच्या रिझल्टवर लक्ष द्या. भाजपचा सिंधुदुर्ग जिल्ह्यात टांगा पलटी होणार आहे. टांगा पलटी झाल्यावर घोडे फरार होतात माहिती आहे ना, असा प्रतिउत्तर भावाला निलेश राणेंनी दिले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सिंधुदुर्ग जिल्ह्या दौऱ्यावर असून, दौऱ्याची सुरुवात मालवणमध्ये असून या सर्व घडामोडींवर शिंदे काय बोलणार आहेत याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Nilesh Rane challenges Ravindra Chavan: Speak plainly, stop using code!

Web Summary : Nilesh Rane criticizes Ravindra Chavan's cryptic statements, urging him to be direct. Rane asserts Chavan is being arrogant and warns him to control the situation. He predicts BJP's defeat in Sindhudurg and awaits Eknath Shinde's reaction.
टॅग्स :PoliticsराजकारणNilesh Raneनिलेश राणे Nitesh Raneनीतेश राणे Ravindra Chavanरविंद्र चव्हाणsindhudurgसिंधुदुर्ग