शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक महिन्याला येणारे बांधकाममंत्री आहेत कुठे? :परशुराम उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 15:07 IST

प्रत्येक महिन्याला सिंधुदुर्गात येऊन महामार्गाची पाहणी करणार असे आश्वासन देणारे सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील आता आहेत कुठे? असा प्रश्न उपस्थित करतानाच खड्डेमय महामार्गामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जखमी झाले आहेत. मात्र, त्यांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे सवड नाही. पण ज्यांनी इथल्या सर्वसामान्य जनतेला खड्ड्यांत घातले अशा अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे वेळच वेळ आहे, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.

ठळक मुद्देप्रत्येक महिन्याला येणारे बांधकाममंत्री आहेत कुठे? :परशुराम उपरकर पालकमंत्र्यांनाही खड्डे दिसत नाहीत का ?

कणकवली : प्रत्येक महिन्याला सिंधुदुर्गात येऊन महामार्गाची पाहणी करणार असे आश्वासन देणारे सार्वजनिक बांधकामंत्री चंद्रकांत पाटील आता आहेत कुठे? असा प्रश्न उपस्थित करतानाच खड्डेमय महामार्गामुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जखमी झाले आहेत. मात्र, त्यांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे सवड नाही. पण ज्यांनी इथल्या सर्वसामान्य जनतेला खड्ड्यांत घातले अशा अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी बांधकाममंत्र्यांकडे वेळच वेळ आहे, अशी टीका मनसेचे प्रदेश सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली आहे.येथील मनसे संपर्क कार्यालयात ते बोलत होते. परशुराम उपरकर पुढे म्हणाले, राज्य सरकार सर्वसामान्यांच्या बाजूने असायला हवे. पण हे सरकार ठेकेदार आणि अधिकाऱ्यांचीच तळी उचलून धरत आहे. कणकवली शहरातील महामार्ग खड्ड्यांच्याप्रश्नी मनसेसह सर्वच पक्षांनी आंदोलने केली. राजकीय पक्ष बाजूला ठेवून कणकवली तालुक्यातील सर्वसामान्य जनता रस्त्यावर उतरली. परंतु याकडे बांधकाममंत्र्यांनी दुर्लक्ष केले आहे. तर मुजोर महामार्ग अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी मात्र तत्परता दाखविली जात आहे. याला काय म्हणावे?"कार्यकर्त्यांना त्रास देण्यापेक्षा खड्डेमुक्तीसाठी वेळ द्याचिखलफेक आंदोलनामधील आमदार नीतेश राणे आणि स्वाभिमानचे कार्यकर्ते यांची छळवणूक करण्यासाठी पालकमंत्री दीपक केसरकर वेगवेगळे फंडे वापरत आहेत. गृहराज्यमंत्री पदाचा अवाजवी वापर करीत आहेत. हाच वेळ त्यांनी महामार्ग दुरुस्ती कामासाठी दिला असता तर जनतेचा त्रास कमी झाला असता असे परशुराम उपरकर यावेळी म्हणाले.किती अधिकारी, ठेकेदार ब्लॅकलिस्टमध्ये गेले?बैठकांना गैरहजर राहणारे अधिकारी तसेच निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकणार असे गेली साडे चार वर्षे पालकमंत्री सांगत आहेत. त्यानंतर महामार्गासह प्रमुख जिल्हा मार्गाची दुरवस्था झाली. तर महसूलसह सर्वच खात्यात भ्रष्टाचार वाढला. त्यामुळे आजपर्यंत पालकमंत्र्यांनी किती अधिकारी आणि ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकले ते जाहीर करावे अशी मागणी उपरकर यांनी यावेळी केली.

टॅग्स :Parshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग