शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाला नवीन बसेस कधी मिळणार?, प्रवाशांची गैरसोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 13:50 IST

सध्या फक्त ३५२ बस उपलब्ध : फेऱ्यांवर परिणाम; किमान ९८ बसची आवश्यकता 

कणकवली : राज्य परिवहन महामंडळाच्या सिंधुदुर्ग विभागातून सन २०१९-२०च्या सुमारास दररोज २१००च्या जवळपास फेऱ्या सुटायच्या. आता त्यांची संख्या १८००वर आली आहे. मात्र, त्यावेळी सिंधुदुर्ग विभागाकडे उपलब्ध बसेसची संख्या ४५०हून अधिक होती, ती आता ३५२वर आली आहे. अशा स्थितीत सध्या सुरू असलेल्या फेऱ्याही टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अजून किमान ९८ बसची आवश्यकता असून, सिंधुदुर्ग विभागाला या नवीन बसेस कधी मिळणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

एसटीच्या सिंधुदुर्ग विभागाला सन २०१९-२० पासून फक्त नवीन दहा बसेस मिळाल्या आहेत. त्यावेळी या विभागात कार्यरत बसेसची संख्या ४५०हून अधिक होती. मात्र, टप्प्याटप्प्यात या बसेसचे आयुष्यमान संपत गेले. शासनाकडून नवीन बसेस न आल्याने आयुष्यमान संपलेल्या बसेस भंगारात काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे बसेसची संख्या घटत गेली. या समस्येकडे शासन तसेच लोकप्रतिनिधी लक्ष देतील का, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.एसटीचा सिंधुदुर्ग विभाग आजही पूर्ण क्षमतेने चालवायचा असेल, तर किमान ४५० सुस्थितीतील बसेसची गरज आहे. परंतु, या विभागाकडे ३५२ बसेस चालू स्थितीत आहेत. पाच वर्षांपूर्वी या विभागाकडून प्रत्येक दिवशी साधारणतः २१००च्या जवळपास बसफेऱ्या सुटत होत्या. त्यातच सुमारे ८० हून अधिक बसेस या कालावधीत भंगारात गेल्या, त्यामुळे या फेऱ्या पुढे कशा सुरू ठेवणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.वर्षभरापूर्वी राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात इलेक्ट्रिक बसेस येणार असल्याचे परिवहन मंत्र्यांकडून जाहीर करण्यात आले होते. सिंधुदुर्गमध्ये चार आगारांमध्ये या बसेससाठी चार्जिंग स्टेशनही तयार करण्यात येत आहेत. मात्र, अद्याप या इलेक्ट्रिक बसेस उपलब्ध झालेल्या नाहीत.सिंधुदुर्ग विभागाला पुढील महिनाभरात काही बसेस मिळतील, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येते. पण मार्च २०२५ पर्यंतचा विचार केला, तर सध्या कार्यरत असलेल्या बसपैकी अजून सुमारे ४० ते ५० बसेस १५ वर्षे पूर्ण झाल्याने भंगारात काढाव्या लागणार आहेत. तोपर्यंत आवश्यक बसेस न आल्यास या विभागातील १८०० फेऱ्यांमध्येही घट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्ग