मृतावस्थेत ‘व्हेल’ मासा सापडला

By Admin | Updated: September 7, 2014 00:36 IST2014-09-07T00:20:28+5:302014-09-07T00:36:00+5:30

देवगडच्या समुद्रकिनाऱ्यावर

The 'whale' fish was found in the dead | मृतावस्थेत ‘व्हेल’ मासा सापडला

मृतावस्थेत ‘व्हेल’ मासा सापडला

जामसंडे : देवगडच्या समुद्रकिनाऱ्यावर शितबावची काठी याठिकाणी सडलेल्या अवस्थेत मृत व्हेल मासा शनिवारी आढळून आला.
देवगड तारामुंबरीमधील ग्रामस्थ बंटी गोलतकर याने याची माहिती देवगड पोलिसांना दिली.
देवगड पोलीस स्थानकातील पोलीस उपनिरीक्षक शिवाजी जायपत्रे, पोलीस उपनिरीक्षक एस. एफ. डोंबाळे, पोलीस शिपाई सिद्धार्थ माळकर, अमित राऊळ, पुंडलिक सावंत आदींसह अन्य पोलिसांनी समुद्रकिनारी जावून मृत व्हेल माशाची पाहणी केली.
हा व्हेल मासा साय जातीचा असावा. तो सुमारे ४५ फूट लांब असावा. यापूर्वीही याच जातीचे व्हेल मासे समुद्रकिनारी मृतावस्थेत सापडले होते अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्हा मानद वन्य जीवरक्षक प्रा. नागेश दप्तरदार यांनी या माशाच्या पाहणीनंतर दिली.
दरम्यान, मासा पाहण्यासाठी शितबावची काठी भागात लोकांनी गर्दी केली होती. (वार्ताहर)
 

Web Title: The 'whale' fish was found in the dead

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.