शहरं
Join us  
Trending Stories
1
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
2
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
3
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
4
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
5
Navi Mumbai Rains: वाशी प्लाझा येथे नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
6
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
7
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! अंधेरी सबवे पाण्याखाली, समुद्रात ४ मीटर उंचीच्या लाटा
9
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
10
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
11
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
12
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
13
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
14
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
15
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
16
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
17
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?
18
सोनम आणि राज कुशवाह यांची नार्को टेस्ट होणार? राजा रघुवंशीच्या कुटुंबाच्या मागणीवर पोलीस म्हणाले..
19
विमानातील 'त्या' सीटची मागणी वाढली, अहमदाबादमधील अपघातानंतर '11A' साठी प्रवासी अधिक पैसे देण्यास तयार

शोधायला गेले गुरे अन् सापडली खैराची तस्करी; गोरक्षकांमुळे गुन्हा उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 17:18 IST

दोडामार्ग : कत्तलीसाठी गुरांची वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने गोरक्षकांनी पाठलाग करून पकडलेल्या टेम्पोतून खैराची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचा ...

दोडामार्ग : कत्तलीसाठी गुरांची वाहतूक होत असल्याचा संशय आल्याने गोरक्षकांनी पाठलाग करून पकडलेल्या टेम्पोतून खैराची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. ही वाहतूक करणारा मुख्य आरोपी संदेश नाईक (रा. तळवडे, ता. सावंतवाडी) याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्या व्हाॅट्सॲपवर पिस्तूलासारख्या हत्याराचे विविध व्हिडीओ आढळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. या प्रकाराची माहिती वनविभागाला दिल्यावर वनकर्मचाऱ्यांनी सर्व मुद्देमाल जप्त करत गुन्हा दाखल केला आहे. त्याच्या मोबाइलमधील व्हाॅट्सॲपवर असलेल्या पिस्तूलच्या व्हिडीओसंदर्भात चौकशी करण्यासाठी आपण पोलिसांना पत्र लिहिणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल वैशाली मंडल यांनी दिली.याबाबत अधिक माहिती अशी की, एका टेम्पोमधून कत्तलखान्यात कत्तल करण्यासाठी गायी नेल्या जात असल्याची माहिती दोडामार्गमधील गोरक्षकांना मिळाली होती. त्यांनी याबाबतची माहिती कसई - दोडामार्गचे नगराध्यक्ष चेतन चव्हाण, भाजपा मंडल अध्यक्ष दीपक गवस, खोक्रल सरपंच देवेंद्र शेटकर, सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस आदींना दिली. लागलीच गोरक्षकांनी ही गाडी मणेरी येथे अडवून तिची तपासणी केली असता त्यातून बेकायदेशीररीत्या खैराच्या झाडांची वाहतूक होत असल्याचे समोर आले.याबाबतची माहिती वनक्षेत्रपाल वैशाली मंडल यांना दिल्यावर त्या लागलीच घटनास्थळी दाखल झाल्या. संशयित आरोपी संदेश नाईक यांच्याकडे चौकशी केली असता त्याने इतरही मुद्देमाल दाखविला. त्याचा पंचनामा करून तो वनाधिकाऱ्यांनी जप्त केला व संशयितांवर गुन्हा दाखल केला.

व्हाॅट्सॲपवरील व्हिडीओची चौकशी व्हावीसंशयित आरोपी संदेश नाईक याची दोडामार्ग - बांदा राज्य मार्गाला रोपवाटिका आहे. मात्र, या रोपवाटिकेच्या आड तो खैराच्या झाडांची तस्करी, कत्तलीसाठी गुरांची वाहतूक करत असल्याचा आरोप गोरक्षकांनी केला. त्याच्या व्हाॅट्सॲपवर पिस्तुलाचे वेगवेगळे व्हिडीओ अज्ञात व्यक्तीच्या नंबरवरून आलेले आहेत. त्यामुळे त्याच्या चॅटिंगची आणि त्या व्हिडीओची सखोल चौकशी व्हावी, तो हत्यारांची तस्करी तर करीत नाही ना? याचाही तपास व्हावा, अशी मागणी यावेळी गोरक्षकांनी केली.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस