राणेंचे कुडाळात स्वागत

By Admin | Updated: July 6, 2014 23:24 IST2014-07-06T23:22:34+5:302014-07-06T23:24:05+5:30

संजय पडते, काका कुडाळकर यांनी पाठ फिरविली

Welcome to Ranee Kuddal | राणेंचे कुडाळात स्वागत

राणेंचे कुडाळात स्वागत

कुडाळ : कुडाळात पालकमंत्री नारायण राणे यांचे तालुका काँग्रेसच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. काँग्रेस प्रवक्ते काका कुडाळकर व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते यांनी मात्र, राणेंच्या स्वागताकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले. राज्याचे उद्योगमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नारायण राणे यांचे रविवारी गोवा मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आगमन झाले. कुडाळ येथील बजाज शोरूम येथे त्यांचे कुडाळ व मालवण तालुका काँग्रेसच्यावतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष विकास कुडाळकर, अशोक सावंत, दत्ता सामंत, कुडाळ उपसरपंच विनायक राणे, जिल्हा परिषद सदस्य रणजीत देसाई, सुनील भोगटे, ग्रामपंचायत सदस्य संध्या तेरसे, रेखा काणेकर, नंदिनी कुडाळकर, सिध्देश बांदेकर, सदा अणावकर, आबा मुंज आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, पालकमंत्री नारायण राणे यांच्यासोबत कायम दिसणारे काका कुडाळकर व संजय पडते हे या स्वागतावेळी अनुपस्थित होते. यामुळे नीतेश राणेंच्या वक्तव्यावरुन सुरु झालेल्या वादाचे पडसाद दिसून येत होते. (प्रतिनिधी)

Web Title: Welcome to Ranee Kuddal