राज ठाकरे यांचे दोन्ही गटांकडून स्वागत

By Admin | Updated: June 28, 2015 23:12 IST2015-06-28T23:12:19+5:302015-06-28T23:12:19+5:30

जुना-नवा वाद चव्हाट्यावर : बांदा, सावंतवाडीतील कार्यकर्त्यांची घेतली भेट

Welcome from both groups of Raj Thackeray | राज ठाकरे यांचे दोन्ही गटांकडून स्वागत

राज ठाकरे यांचे दोन्ही गटांकडून स्वागत

बांदा : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे बांदा नगरीत जुन्या व नव्या गटाकडून दोन ठिकाणी स्वागत करण्यात आल्याने मनसेतेतील जुन्या व नव्या गटाचा वाद चव्हाट्यावर आला आहे. राज ठाकरे यांनीदेखिल दोन्ही गटांचे स्वागत स्विकारले.
मनसेत देखिल दोन गट कार्यरत असून दोन्ही गटांचे पदाधिकारी व कार्यकर्ते आपल्या परीने पक्ष संघटनेचे कार्य करीत आहेत. आज सावंतवाडी येथून बांद्यात आल्यानंतर सर्वप्रथम जुन्या गटाने राज ठाकरे यांचे बांदा महामार्गावर बसस्थानकानजीक स्वागत केले. ठाकरे यांनीदेखिल स्वागत स्विकारुन कार्यकर्त्यांची विचारपूस केली. त्यानंतर लागलीच बांदा कट्टा कॉर्नर येथे राज ठाकरे यांचे मनसेच्या नव्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यामध्ये मनसे व्यतिरिक्त भाजप व शिवसेनेच्या काहि काहि कार्यकर्त्यांनी देखिल ठाकरे यांचे बांदा नगरीत स्वागत केले.
यावेळी माजी विभाग अध्यक्ष मिलिंद सावंत, तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर येडवे, अनिल केसरकर, राजन दाभोलकर, राजेश पडते, सुशांत पांगम, ओंकार नाडकर्णी, राजु कासकर, दिनेश मुळिक, अतुल केसरकर, सुनील सावंत, संतोष भैरवकर, अनुप नाईक, राकेश टंगसाळी, महेश बांदिवडेकर, प्रमोद तावडे, नितिन गावडे, सुनिल आश्वेकर, रवी गावडे, अनिल सावंत, नंदु सावंत, अरविंद गावकर, पुंडलिक गावकर, सतीश आकेरकर, प्रसाद गावडे आदींसह कार्यकर्ते उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

Web Title: Welcome from both groups of Raj Thackeray