शहरं
Join us  
Trending Stories
1
'जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद ठेचून काढा', गृहमंत्री अमित शाह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश
2
वायकरांच्या मुलीकडेही मोबाईल, तक्रार आमची, मध्येच तहसीलदार कुठून आले; उमेदवार शाह यांचा गौप्यस्फोट
3
गौतम गंभीरच्या मागण्या BCCI कडून मान्य, लवकरच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून होणार घोषणा 
4
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
5
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
6
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
7
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
8
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
9
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
10
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
11
शाकिब अल हसनने भारताच्या वीरेंद्र सेहवागचा अपमान केलाच नाही; पाहा त्या घटनेचा पूर्ण Video 
12
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
13
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
14
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
15
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
16
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
17
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
18
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
19
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
20
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...

दहशत, अपप्रवृत्ती विरोधात आवाज उठवणार - संदेश पारकर 

By सुधीर राणे | Published: September 08, 2023 7:22 PM

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे , युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर ...

कणकवली : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे. या जबाबदारीच्या माध्यमातून सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन कणकवली, देवगड, वैभववाडी आणि मालवण या चारही तालुक्यांमध्ये संघटनात्मक बांधणी करण्यात येईल. आम्ही दहशत,अपप्रवृत्ती विरोधात आवाज उठवणार आहोत.कणकवली विधानसभेसाठी उमेदवार कोण ? यापेक्षा शिवसेना संघटना बांधणी हे महत्वाचे असल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे नूतन जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सांगितले.शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा गावभेट कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्येक गावातील शिवसैनिकांना ताकद देणार आहे. ज्या मालवण मध्ये राणेंचा पराभव वैभव नाईक यांनी केला. त्याचप्रमाणे कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा भगवा फडकेल, अशी संघटना बांधणी केली जाईल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.कणकवली येथील विजय भवन  येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला आघाडी अध्यक्षा निलम पालव -सावंत, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, देवगड तालुकाप्रमुख मिलिंद साटम, शहरप्रमुख प्रमोद मसुरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.ते म्हणाले, धनशक्तीच्या जोरावर फोडाफोडीचे राजकारण करून स्थानिक सत्ता व कार्यकर्ते फोडण्याचे काम भाजपकडून केले जात आहे. त्या विरोधात जनतेच्या मनात तीव्र संतापाची लाट आहे. त्यामुळे शिवसेना संघटना बांधणी करत राणे भाजपचा पराभव कणकवलीत घडवणार आहोत. एक वर्ष हे निवडणुकीचे आहे. पुढच्या वर्षभरात परिवर्तन घडेल.खासदार विनायक राऊत जेव्हा पहिल्यांदा खासदारकीसाठी उभे राहिले तेव्हा नवखे होते,मात्र तेव्हाच्या मूठभर शिवसैनिकांच्या जीवावर ते लढले. दोनदा निलेश राणेचा पराभव त्यांनी केला. कुडाळ -मालवण विधानसभा निवडणुकीत राणेंचा पराभव वैभव नाईक यांनी केला. जिल्ह्यातील जनतेला हा दहशत वाद मान्य नाही. त्यामुळे या अप प्रवृत्तीच्या विरोधात शिवसेना लढणार आहे. जिल्ह्यातील आरोग्याचा प्रश्न असेल,प्रशासकीय व्यवस्था व अन्य सर्व समस्यांबाबत शिवसेना यापुढे आक्रमकपणे लढा देईल असेही पारकर यांनी सांगितले.आता तर हा पक्षासाठी संघर्षाचा काळ आहे. भाजपा विरोधात जनतेच्या मनात फार चीड आहे, संतापाची लाट आहे.त्यामुळे उद्धव ठाकरे पुन्हा राज्याचे नेतृत्व करतील. त्यासाठी संघटनेत, आवश्यक बदल करावे लागतील. जुन्या नव्याने एकत्र करुन चांगली संघटना बांधणी केली जाईल. पक्षाला न्याय देणाऱ्या कार्यकर्त्याला संधी दिली जाईल. असे पारकर म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे