शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Dhangar Reservation: आरक्षणाच्या आडवे येणाऱ्यांना सोडायचे नाही - गोपीचंद पडळकर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2023 13:14 IST

सिंधुदुर्गनगरी येथे धनगर आरक्षण जागर यात्रा

ओरोस : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या समाजाला आधीच आरक्षण दिले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी होत नाही. ती अंमलबजावणी व्हावी, अशी आपली मागणी आहे. आता ते सुद्धा अंतिम टप्प्यात आले आहे. त्याच्या आडवे येणाऱ्यांना सोडायचे नाही. राज्यातील सर्व भटके विमुक्त जाती, जमाती यांचा मोठा भाऊ म्हणून धनगर समाजाला पुढाकार घेऊन सर्वांना न्याय द्यायचा आहे, असे आवाहन धनगर समाज नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी सिंधुदुर्गनगरी येथे धनगर आरक्षण जागर यात्रेत केले.सिंधुदुर्गनगरी येथील माध्यमिक शिक्षक पतपेढी सभागृहात धनगर आरक्षण जागर यात्रा आमदार पडळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी शिवराज बीडकर, बाळा गोसावी, नवलराज काळे, राजेश जानकर, कानू शेळके, गंगाराम शिंदे, राधिका शेळके, दीपा ताटे, किशोर वरक, सुरेश झोरे, बाळा कोकरे, देऊ जंगले, संतोष साळसकर, अमोल जंगले, सुशील खरात, भरत गोरे आदी उपस्थित होते.

दीपप्रज्वलन करून आणि धनगर समाजातील महान व्यक्तींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जागर यात्रेला प्रारंभ झाला. यावेळी श्यामसुंदर मोडक, किशोर वरक, नवलराज काळे, कानू शेळके यांनी विचार व्यक्त केले.यावेळी आमदार पडळकर म्हणाले, १९६१ पासून धनगर आरक्षण प्रश्न प्रलंबित आहे. आपण २०१८ मध्ये यासाठी आंदोलन हातात घेतले. तेव्हापासून डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करण्याची मागणी करीत आहे. परंतु शरद पवार यांच्यामुळे आम्हाला न्याय मिळू शकला नाही. धनगर जागा झाल्यास प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकते.धनगरांच्या बाजूने आपण १७० पुरावे दिले आहेत. निकाल १०१ टक्के आपल्या बाजूने लागणार आहे. परंतु आपल्याला शांत बसायचे नाही. मिळालेले आरक्षण लागू करणे हा प्लॅन ‘ए’ आहे. तर रस्त्यावर उतरून लढाई करायची, हा प्लॅन ‘बी’ आहे. यासाठी राजकीय पक्ष बाजूला ठेवून आपल्याला एकत्र यायचे आहे, असे आवाहन आमदार पडळकर यांनी केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गDhangar Reservationधनगर आरक्षणGopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवार