वाफोली धरणात पाणीसाठा वाढला
By Admin | Updated: July 20, 2014 22:14 IST2014-07-20T22:06:24+5:302014-07-20T22:14:33+5:30
धबधबे प्रवाहीत :

वाफोली धरणात पाणीसाठा वाढला
सुट्टीच्या दिवशी होतेय पर्यटकांची गर्दीबांदा : वाफोली गावचे जीवनदायीनी असलेले वाफोली धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने धरण ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. यामुळे या परिसरात धबधबे निर्माण झाले असून याठिकाणी सुट्टीच्या दिवशी पर्यटक गर्दी करताना दिसत आहेत.जून महिना कोरडा गेल्याने धरण कोरडेच होते. जुलैचा पहिल्या आठवड्यात देखिल पाऊस नसल्याने धरणातील पाणीसाठ्यावर याचा परिणाम झाला. धरणात जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत केवळ ३0 टक्केच पाणीसाठा शिल्लक होता. गेल्या आठ दिवसात धरण परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्याने धरण संपूर्ण भरले आहे. वाफोलीचे धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने दुथडी भरुन वाहत आहे. धरण तुडुंब भरल्याने पाण्याचा विसर्ग होत आहे. पाण्याच्या विसर्गामुळे याठिकाणी कृत्रिम धबधबे निर्माण झाले आहेत. यामुळे धरण परिसरात सुट्टीच्या दिवशी पर्यटक गर्दी करत आहेत. तसेच बांदा- आंबोली मार्गावर हे धरण असल्याने गोव्यातून आंबोलीला जाणारे पर्यटक याठिकाणी मुद्दामहून थांबून येथील निसर्ग पर्यटनाचा आस्वाद घेत
आहेत. (प्रतिनिधी)