शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जलक्रीडा व किल्ले प्रवासी होडी वाहतूक २६ मे पासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 11:40 IST

मालवण : जलक्रीडा व किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक पावसाळी हंगामात म्हणजे २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत ...

मालवण : जलक्रीडा व किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतूक पावसाळी हंगामात म्हणजे २६ मे ते ३१ ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश प्रादेशिक बंदर अधिकारी एस. व्ही. भुजबळ यांनी दिले आहेत. याबाबत महाराष्ट्र सागरी मंडळाच्या मुख्य बंदर अधिकाऱ्यांनी पाठविलेल्या पत्रानुसार कार्यवाही करण्याचेही निर्देश प्रादेशिक बंदर अधिकाऱ्यांनी सर्व बंदर निरीक्षक व सहायक बंदर निरीक्षकांना दिले आहेत.दरम्यान, सध्या सागरी हवामान चांगले आहे. त्यामुळे जलक्रीडा व किल्ले सिंधुदुर्ग प्रवासी होडी वाहतुकीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी पर्यटन व्यावसायिकांनी केली आहे. सरसकट आदेश, नियमामुळे सागरी पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या स्थानिक व्यावसायिकांना दरवर्षी लाखो रुपयांच्या आर्थिक नुकसानीस सामोरे जावे लागते. दरवर्षी १० जूनपर्यंत सागरी पर्यटनासाठी देश-विदेशातील लाखो पर्यटक जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टीवर भेट देतात. किनारपट्टीवरील वातावरणाचा विचार करता २६ ते ३१ मे अशी पहिल्या टप्प्याची, तर सागरी हवामान चांगले असल्यास १ ते १० जूनपर्यंत दुसऱ्या टप्प्याची मुदतवाढ मिळावी. १० जूननंतर सरासरी पाऊस सक्रिय होतो. या पूर्वीही सागरी पर्यटनाला मुदतवाढ मिळाली आहे. जलक्रीडा व किल्ला प्रवासी होडी वाहतुकीसाठी परवानगी मिळावी, अशी मागणी स्थानिक व्यावसायिक करत आहेत.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSea Routeसागरी महामार्ग