शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
6
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
7
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
8
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
9
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
10
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
11
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
12
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
13
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
14
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
15
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
16
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
17
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
18
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

पाणीटंचाईचे ढग यंदा ‘निरभ्र’च

By admin | Published: March 15, 2017 11:10 PM

जिल्हा परिषद : २ कोटी ६५ लाखांचा आराखडा

रत्नागिरी : सरासरीपेक्षा जास्त पाऊस आणि बांधण्यात आलेले बंधारे यामुळे यंदा जिल्ह्यात अद्याप पाणीटंचाई सुरु झालेली नाही. जिल्ह्यात उद्भवणाऱ्या टंचाईला सामोरे जाण्यासाठी २ कोटी ६५ लाख रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, यावेळच्या कृती आराखड्यामध्ये विंधन विहिरी आणि नळपाणी योजना दुरुस्तीचा समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागामध्ये डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांमध्ये दरवर्षी उन्हाळ्याच्या दिवसांत भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ त्यामुळे धनगरवस्त्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी कित्येक मैल डोंगरदऱ्यातून पायपीट करावी लागते़ गतवर्षी लांजा तालुक्यातील पालू - चिंचुर्टी गावातील धावडेवाडीमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवू लागल्याने लोकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागली होती. ही धावडेवाडी लांजापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर वसलेली आहे. ही माचाळ या अतिउंच डोंगराळ गावाच्या नजीक आहे. त्यामुळे पालू - चिंचुर्टीतील धावडेवाडीमध्ये पहिला टँकर प्रशासनाकडून धावला होता. यावर्षीचा संभाव्य आराखडा २ कोटी ६५ लाख रुपयांचा आहे. गतवर्षीच्या आराखड्यामध्ये विंधन विहिरींची कामे आणि नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीच्या कामांचा समावेश करण्यात आलेला नव्हता. यंदा दोघांचाही समावेश करण्यात आला आहे.या टंचाईग्रस्तांना सुमारे २५ टँकर्सनी पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. या आराखड्यानुसार नळपाणी पुरवठा योजनांच्या दुरुस्तीवर सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. तसेच विंधन विहिरींसाठी ५७ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ४१ लाख २० हजार रुपये तरतूद करण्यात आली आहे. हा आराखडा तयार करुन जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तो मंजुरीसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्याला मंजूरीही जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.जिल्हा परिषद कृषी विभागाने पाणी आडवा, पाणी जिरवा या तत्त्वावर श्रमदानातून बंधारे उभारण्यास सुरुवात केली होती. यामध्ये वनराई, कच्च बंधारे समावेश आहे. जिल्ह्यात सुमारे ५ हजारांपेक्षा जास्त बंधारे उभारण्यात आल्याने त्याचा फायदा पाणीटंचाई दूर जाण्यासाठी झाला. गतवर्षी १८ मार्चपासून जिल्ह्यात पाणीटंचाई सुरु झाली होती. मात्र, यंदा अजून टंचाई सुरु झालेली नसली तरी काही भागातून टँकरची मागणी करण्यात आली आहे. (शहर वार्ताहर)