शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर पाणी; रस्ता बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 17:40 IST

गगनबावडा तालुक्यातील मांडकुली, किरवे, लोंघे या तीन ठिकाणी पुन्हा पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर शनिवारी सुरू करण्यात आलेली वाहतूक रविवारी दुपारपासून पुन्हा बंद होती. वाहतूक बंद झाल्याचा संदेश मिळेपर्यंत कित्येक वाहनांनी घाटरस्ता पार केला होता. त्या वाहनांना गगनबावड्यातून माघारी परतावे लागले. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे.

ठळक मुद्देगगनबावडा-कोल्हापूर मार्गावर पाणी; रस्ता बंद

वैभववाडी : गगनबावडा तालुक्यातील मांडकुली, किरवे, लोंघे या तीन ठिकाणी पुन्हा पुराचे पाणी रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-गगनबावडा-कोल्हापूर मार्गावर शनिवारी सुरू करण्यात आलेली वाहतूक रविवारी दुपारपासून पुन्हा बंद होती. वाहतूक बंद झाल्याचा संदेश मिळेपर्यंत कित्येक वाहनांनी घाटरस्ता पार केला होता. त्या वाहनांना गगनबावड्यातून माघारी परतावे लागले. दरम्यान, या मार्गावरील वाहतूक फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली आहे.घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरू आहे. घाटमाथ्यावरील धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्गदेखील सुरू आहे. त्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचे पाणी गगनबावडा तालुक्यातील तीन ठिकाणी रस्त्यावर आले आहे. दोन ते तीन फूट रस्त्यावर आल्यामुळे तळेरे-कोल्हापूर मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान, बालिंगा पुलाला पाणी टेकल्याने गेल्या चार पाच दिवसांपासून या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्यात आली होती. परंतु दोन दिवसांपासून लहान वाहनांसाठी हा मार्ग खुला करण्यात आला होता. शनिवारपासून सरसकट वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र रविवारी पुन्हा रस्त्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली.कोल्हापूर प्रशासनाकडून वाहतूक बंद केल्याचा संदेश सिंधुदुर्ग प्रशासनाकडे पोहोचेपर्यंत वैभववाडीकडून जाणाऱ्या अनेक वाहनांनी करूळ घाट पार केला होता. गगनबावड्यात या वाहनांना थांबवून पुन्हा माघारी पाठविण्यात आले. या मार्गावरील वाहतूक सध्या फोंडाघाटमार्गे वळविण्यात आली. तालुक्यात वादळीवाऱ्यांसह पाऊस पडत असल्यामुळे अनेक ठिकाणी झाडे, झाडांचा फांद्या मोडून पडण्याचे प्रकार सुरू आहेत. वादळाचा जास्त फटका वीज वितरणला बसल्याने या भागातील वीजपुरवठा बंद होता. 

टॅग्स :Rainपाऊसsindhudurgसिंधुदुर्गkolhapurकोल्हापूर