शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

"गेली पाच वर्षे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे होते, तेव्हा खासदार विनायक राऊत झोपले होते का?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2020 17:11 IST

जिल्ह्यातील काही जुन्या प्रकरणांचा पुन्हा नव्याने तपास करणार असल्याचे खासदार विनायक राऊत सांगत आहेत. मग गेली पाच वर्षे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे होते, त्यावेळी खासदार राऊत आणि आमदार वैभव नाईक झोपले होते का? असा प्रतिटोला भाजपा नेते, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी लगावला आहे.

ठळक मुद्दे गेली पाच वर्षे खासदार झोपले होते का ?, अतुल काळसेकर यांचा सवालविनायक राऊत यांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

कणकवली : अभिनेता सुशांतसिंह मृत्यू प्रकरणात काही शिवसेना नेत्यांची नावे असल्याची चर्चा सुरू झाली. त्याविषयी खासदार नारायण राणे यांनी आवाज उठविल्यानंतर विनाकारण त्रास देण्याच्या हेतूने जिल्ह्यातील काही जुन्या प्रकरणांचा पुन्हा नव्याने तपास करणार असल्याचे खासदार विनायक राऊत सांगत आहेत. मग गेली पाच वर्षे गृहराज्यमंत्री शिवसेनेचे होते, त्यावेळी खासदार राऊत आणि आमदार वैभव नाईक झोपले होते का? असा प्रतिटोला भाजपा नेते, जिल्हा बँक संचालक अतुल काळसेकर यांनी लगावला आहे.याबाबत त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, भाजपा नेत्यांच्या पाठपुराव्याने जिल्ह्यात दोन कोविड तपासणी लॅब उभ्या झाल्या. याचा पोटशूळ सत्ताधारी नेत्यांना आहे. मात्र, राणेंच्या कोविड लॅबचे राजकारण नको. कारण अत्यावश्यक असलेल्या लोकांना कोविड अहवाल तत्काळ मिळत आहेत.शिवसेनेच्या नेत्यांना केवळ राजकारणापलीकडे काहीच दिसत नाही. आता जुन्या गुन्ह्यांबाबत वक्तव्य करून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यापूर्वीच संबंधित गुन्ह्यांबाबत पोलिसांनी तपास केलेला आहे. मग पुन्हा तपास करणार असल्याचे सांगून जनतेची दिशाभूल खासदार राऊत यांनी करू नये.अनेकदा अशा तपासाच्या घोषणा शिवसेनेच्या नेत्यांनी केलेल्या आहेत. जर खरोखरच या गुन्ह्यात काही तथ्य होते आणि त्याचा छडा लावायचा होता तर या जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री व गृहराज्यमंत्री दीपक केसरकर असताना विनायक राऊत यांनी का प्रयत्न केले नाहीत ? केसरकर यांना राणे विरोधाचे श्रेय मिळेल म्हणून त्यांनी तसे केले नाही का? याचे उत्तर द्यावे.मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून केवळ खासदार राऊत दिखाऊपणा करीत आहेत. सध्या सिंधुदुर्गात दर दिवशी कोविड रुग्णांची संख्या वाढत आहे. सरकारी रुग्णालयात कोविड लक्षणे नसल्यास तपासणी केली जात नाही. त्यामुळे पडवे येथील लाईफटाईम हॉस्पिटलमध्ये कोविड लॅब झाल्यानंतर काही लोक राजकारण करीत आहेत.

या काळात जिल्ह्यातून इतर राज्यांमध्ये जाणाऱ्या लोकांना ताबडतोब अहवाल मिळत आहे. तसेच जिल्ह्यातील नोकरीनिमित्त जाणारे नागरिक, शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी व अन्य लोकांसाठी पडवेतील ही लॅब अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. रत्नागिरीतील वालावलकर हॉस्पिटल येथील कोविड तपासणी लॅब बंद करण्यात आली. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांसाठी ही लॅब फार महत्त्वाची आहे.राणेंच्या हॉस्पिटलमध्ये अत्यंत कमी दरात डायलिसीसनारायण राणे यांच्या हॉस्पिटलमुळे न होऊ शकणाऱ्या शस्त्रक्रिया जिल्ह्यात होत आहेत. अत्यंत कमी दरात डायलिसीस सेवा तिथे सुरू आहे. जिल्ह्यातील सरकारी हॉस्पिटलमध्ये किती डायलिसीस होतात आणि जिल्ह्यात किती रुग्ण आहेत याचाही हिशोब खासदारांनी घ्यावा. मग कदाचित त्यांच्या मानेवरचे राणे विरोधाचे भूत उतरेल. असेही काळसेकर यांनी या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणAtul Kalasekarअतुल काळसेकरShiv SenaशिवसेनाVinayak Rautविनायक राऊत sindhudurgसिंधुदुर्ग