शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

आयएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार, पर्यटनाला चालना मिळणार 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 18, 2025 18:59 IST

गुलदार नावाचा अर्थ काय.. वाचा सविस्तर

कणकवली : भारतीय नौदलाच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारी आयएनएस गुलदार ही युद्धनौका लवकरच विजयदुर्ग बंदरात स्थिरावणार आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश आले असून, ही नौका आता लोकांसाठी खुली होणार आहे. यामुळे सिंधुदुर्गमधीलपर्यटनाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.विजयदुर्ग किल्ले प्रेरणोत्सव समितीच्या माध्यमातून विजयदुर्गवासीयांनी मंत्री नितेश राणे यांच्याशी संपर्क साधला होता. समितीचे संस्थापक अध्यक्ष राजीव परुळेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यांनी या नौकेला विजयदुर्ग बंदरात आणण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्याचे आश्वासन दिले होते. अखेर, त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही नौका विजयदुर्ग बंदरासाठी मिळवण्यात यश आले आहे.

पर्यटनवाढीस लागणार मोठा हातभारही नौका पाहण्यासाठी देश-विदेशातील पर्यटक विजयदुर्गला येणार आहेत. यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फायदा होणार आहे. नौकेचे स्थलांतर कर्नाटक येथील बंदरातून करण्यात येणार असून, पर्यटन महामंडळाने त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. लवकरच ही नौका विजयदुर्ग बंदरात दाखल होईल.

आयएनएस गुलदार एक शक्तिशाली युद्धनौकाभारतीय नौदलाच्या ऑण्डिंग शिप टँक (मध्यम) श्रेणीतील आईएनएस गुलदार हे जहाज, त्याच्या सामरिक क्षमतांमुळे, नौदलाचा एक महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.

महत्त्वाची वैशिष्ट्ये

  • नौदलात समावेश : ३० डिसेंबर १९८५
  • विस्थापन : १,२०० टन
  • लांबी : ८१ मीटर
  • रुंदी (बीम) : १० मीटर
  • सक्षम अधिकारी व कर्मचारी : ६ अधिकारी आणि ८५ खलाशी

वाहन क्षमता :

  • चिलखती कर्मचारी वाहक,
  • रणगाडे (टँक),
  • स्वयंचालित तोफा, ट्रक
  • १५० पेक्षा अधिक सैन्य

सामरिक सामर्थ्य आणि संरक्षणआईएनएस गुलदार अत्याधुनिक ३० मिमी क्लोज-रेंज गन आणि रॉकेट लाँचर्सने सुसज्ज आहे. हे जहाज विविध नौदल मोहिमांमध्ये प्रभावीपणे सहभागी झाले आहे.

आपत्ती निवारण आणि मानवी मदतकार्ययुद्धसज्जतेव्यतिरिक्त, हे जहाज नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदतकार्य, अडकलेल्या नागरिकांची सुटका आणि आपत्कालीन साहित्य वितरणासाठीही वापरले जाते.

गुलदार नावाचा अर्थगुलदार हे नाव भारतीय बिबट्याच्या (गुलदार) प्रजातीवरून ठेवण्यात आले आहे. जे नौकेच्या वेग, ताकद आणि चपळतेचे प्रतीक आहे.

विजयदुर्गसाठी नव्या पर्वाची सुरुवातभारतीय नौदलाचे आईएनएस गुलदार ही केवळ युद्धनौका नसून, सागरी संरक्षण, सामरिक सामर्थ्य आणि मानवतावादी सेवांचे एक प्रेरणादायी प्रतीक आहे. लवकरच ही नौका विजयदुर्ग बंदरात दाखल होईल, ज्यामुळे या ऐतिहासिक ठिकाणाचे महत्त्व आणखी वाढेल.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गindian navyभारतीय नौदलSea Routeसागरी महामार्गtourismपर्यटन