निर्भिडपणे मतदान करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By Admin | Updated: October 14, 2014 23:22 IST2014-10-14T21:50:46+5:302014-10-14T23:22:36+5:30

टक्केवारी वाढीसाठी विविध उपक्रम

Vote without fear: District Collector appeals | निर्भिडपणे मतदान करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

निर्भिडपणे मतदान करा : जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

सिंधुदुर्गनगरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणुका २०१४ च्या अनुषंगाने १५ आॅक्टोबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होत आहे. मतदारांनी मतदानाचा पवित्र हक्क बजावावा. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी निर्भीड, निप:क्ष व मुक्त वातावरणात मतदान करावे व मतदानाची टक्केवारी वाढावी, असे आवाहन जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी केले आहे.
जिल्ह्यात मतदान वाढीसाठी निवडणूक यंत्रणेमार्फत प्रयत्न करण्यात आले आहेत. राष्ट्रीय मतदार दिवस, कमी मतदान टक्केवारीच्या गावांमध्ये विशेष मोहीम, महिलांचे कमी मतदान झालेल्या गावांमध्ये विशेष मोहीम, पथनाट्याद्वारे मतदार जागृती, आठवडा बाजारात मतदान यंत्राची माहिती देणे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची मतदान जागृती रॅली, संकल्प पत्र वाटप, माध्यमांच्या सहाय्याने मतदारांना आवाहन हे उपक्रम मतदार शिक्षण व जाणीव जागृतीअंतर्गत करण्यात आले आहेत.
राष्ट्रीय मतदार दिवसमतदारांमध्ये जागृती व्हावी या दृष्टीकोनातून २५ जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय मतदारदिनी नव्याने नोंदणी झालेल्या सर्व मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी छायाचित्र ओळखपत्र (इपिक) आणि बिल्ले समारंभपूर्वक वाटप केले जाते. उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालय येथे मतदार दिन राबविण्यात आला होता. या कार्यक्रमाच्यावेळी मतदारांना मतदानाचे महत्त्व पटवून देऊन मतदानाचे आवाहन केले व शपथ दिली. ‘आम्ही भारताचे नागरिक, लोकशाहीवर निष्ठा ठेवून, याद्वारे प्रतिज्ञा करतो की, आपल्या देशाच्या लोकशाही परंपरेचे जनत करू आणि मुक्त, निष्पक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात, समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदान करू, अशी शपथ दिली.लोकसभा २०१४ च्या निवडणुकीमध्ये सावंतवाडी तालुक्यातील ज्या गावांमध्ये ६० टक्के पेक्षा कमी मतदान झालेल्या गावांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. तालुक्यातील अशा २८ गावांमध्ये मतदार जनजागृतीची विशेष मोहीम राबविण्यात आली. यामध्ये मतदारांना ईव्हीएम मशीनची माहिती देऊन मतदारांना मतदानासाठी आवाहन करण्यात आले.लोकशाही सुदृढ होण्याच्या दृष्टीने मतदान करणे आवश्यक आहे. सशक्त लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी प्रत्येकाने विचारपूर्वक मतदान करणे गरजेचे आहे. तुमच्या एका बहुमूल्य मताने भारतीय लोकशाही अधिक बळकट, मजबूत होईल यात शंका नाही.
तेव्हा मी १५ आॅक्टोबर रोजी मी मतदान करणारच असे मनात पक्के करा. होणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही स्वत: तर मतदान कराच. परंतु १८ वर्षांपुढील आपले मतदार नातेवाईक, शेजारी, मित्र परिवार यांनाही मतदानासाठी प्रवृत्त करा आणि सशक्त लोकशाही बळकटीकरणाचे साक्षीदार व्हा, असे आवाहन जिल्हाधिकारी ई. रविंद्रन यांनी केले. (प्रतिनिधी)

संकल्पपत्राचे वाटप
देशहित व जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणाऱ्या सर्वोत्तम उमेदवाराची निवड करण्यासाठी कुटुंबातील व परिचित व्यक्तींना मतदानासाठी प्रेरीत व प्रोत्साहित करण्यासाठी मतदानाच्या हक्काची व जबाबदारीची जाणीव व्हावी या दृष्टीकोनातून सर्व केंद्रस्तरीय अधिकारी, महिलांचे बचतगट व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना संकल्पपत्राचे वाटप करून मतदानाचे आवाहन करण्यात आले.

लोकसभा २०१४ च्या निवडणुकीमध्ये ज्या गावांमध्ये महिला मतदारांची टक्केवारी ६० टक्केपेक्षा कमी झाली आहे त्या गावांमध्ये विशेष मोहीम राबवून जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी महिलांना आवाहन करण्यात आले.

आठवडा बाजारादिवशी माहिती
आठवडा बाजारामध्ये परिसरातील लोक मोठ्या प्रमाणात येत असल्यामुळे लोकांपर्यंत मतदानाबाबतची माहिती पोहचवण्यासाठी बाजाराच्या ठिकाणी सर्व केंद्रस्तरीय अधिकारी, तलाठी यांचेमार्फत स्टॉल लावून नागरिकांना मतदान प्रक्रियेची माहिती देण्यात आली तसेच नोटा पर्यायाबद्दलही माहिती सांगण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या रॅली
प्रत्येक मतदारसंघनिहाय तालुक्यातील महाविद्यालयीन एनएसएस व एनसीसीमधील विद्यार्थ्यांची रॅली काढून मतदारांना मतदानाचे आवाहन करण्यात आले. त्यामुळे त्याचा फायदा होणार आहे.

Web Title: Vote without fear: District Collector appeals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.