शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
2
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
3
Shivalik Sharma: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूला अटक, लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
4
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
5
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
6
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
7
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
8
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
9
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
10
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
11
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
12
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
13
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
14
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
15
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
16
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
17
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
18
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
19
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
20
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल

भू मोजणी ग्रामस्थांनी रोखली

By admin | Updated: January 19, 2016 00:05 IST

श्रावण येथील धरण : ग्रामस्थांकडून अधिकाऱ्यांना घेराव

आचरा : श्रावण गवळीवाडी येथील पावणाईचे भाटले व झऱ्याची वाडी क्षेत्रात लघुपाटबंधारे योजनेतून होऊ घातलेल्या धरणाच्या भू मोजणीस ग्रामस्थांनी तीव्र विरोध करत १५ हेक्टरच्या भू मोजणीस आलेल्या अधिकाऱ्यांना घेराव घालत भू मोजणी ग्रामस्थांनी रोखली. भू मोजणीचे काम लघुसिंचन (जलसंधारण) उपविभाग आंबडपाल कुडाळ यांच्यामार्फत होणार होते. यावेळी संसार उद्ध्वस्त करणारे धरणच नको असल्याने मोजणीच कशाला असा सवाल करत अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी घेराव घातला.यावेळी मोजणीसाठी लघुसिंचन उपविभागीय अभियंता व्ही. आर. अजेटराव, शाखा अभियंता एस. पी. टकले, भू मापन अधिकारी चैतन्य गोसावी, वनविभागाचे राठोड, मंडल अधिकारी एन. बी. पाटील, ठेकेदार बाप्पा मांजरेकर उपस्थित होते. यावेळी मोजणी रोखण्यासाठी ग्रामस्थांसोबत माजी सभापती सीमा परुळेकर, राजू परुळेकर, नितीन पवार, ग्रामस्थ प्रकाश सावंत, विजय गवळी, मंगेश यादव, दीपक पाटकर, प्रमोद गवळी, दीपाली पाटकर, सिमंतनी कासले, सविता सडेकर, विद्या गवळी, सुगंधा नाटेकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.दरम्यान, श्रावण गवळीवाडीतील धरणासाठी लागणाऱ्या १५ हेक्टर जागेच्या भूसंपादनासाठी भू मोजणीच्या नोटीसा ३ जानेवारीला ग्रामस्थांना बजावण्यात आल्या होत्या. परंतु ग्रामस्थांनी नोटीसा न स्वीकारत आपला धरणास असलेला विरोध कायम असल्याचे दाखवून दिले होते. अधिकाऱ्यांना रस्त्यावरच रोखलेसोमवारी १० वाजण्याच्या सुमारास मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी श्रावण गवळीवाडीच्या रस्त्यावरच रोखले. आम्हाला धरणच नको आहे तर तुमची मोजणी कशाला असा सवाल करत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. यावेळी अधिकारी व ठेकेदार आप्पा मांजरेकर यांनी ग्रामस्थांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी आपला विरोध कायम ठेवला. गावात मोजणीसाठी पाऊलही ठेवू देणार नसल्याचा इशारा दिला. त्यामुळे आता हा धरण प्रकल्प वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.(वार्ताहर)धरण झाल्यास : आत्मदहनाचा इशाराग्रामस्थांच्यावतीने बाजू मांडताना विजय गवळी म्हणाले की, ४५ एकर जमीन या धरणात जाणार आहे. आमच्या आंबा, काजू कलमे बागा यात नष्ट होणार आहेत. आमच्या शेतजमिनीही राहणार नाहीत तर आम्हाला धरणाचा काय उपयोग असा सवाल अधिकाऱ्यांना केला तर शासन आमच्यावर जबरदस्तीने धरण लादत असेल तर श्रावण गवळीवाडीत प्रत्येक ग्रामस्थ आत्मदहन करेल असा इशारा देत ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना गावातून निघून जाण्यास सांगितले. ग्रामस्थांचा विरोध असेल तसा अहवाल आपण वरिष्ठांना पाठवू असे सांगत ग्रामस्थांची मोजणीस परवानगी नसेल तर मोजणी करणार नाही असे सांगत काढता पाय घेतला.महिलांची आक्रमक भूमिकादरम्यान, अधिकाऱ्यांची ग्रामस्थांशी चर्चा चालू असताना मोजणीसाठी आलेल्या ठेकेदाराच्या कामगारांची गाडी गावात गेली असता महिलांनी गाडीचा पाठलाग करत वाडीत घुसलेली गाडी परतवून लावली व आमचे संसार बुडविणारे धरण कदापी होऊ देणार नसल्याचा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.