सिंधुदुर्ग : दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी गावात सोमवारी एक रानटी टस्कर हत्ती दाखल झाला. या हत्तीने एका युवकाचा पाठलाग केला; मात्र तिलारी नदीच्या कालव्यातील पाण्यात उडी टाकून त्याने आपला जीव वाचवला. या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे.हत्ती गावालगत दाखल झाल्यामुळे काही धाडसी तरुणांनी त्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. मात्र हत्ती घनदाट झाडीत शिरल्यामुळे युवक माघारी फिरले. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घोटगेवाडीत रवाना झाले आहेत.याबाबत वनविभागाचे अधिकारी सुभाष पुराणिक म्हणाले की, याबाबतची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली. त्यानुसार आमचे कर्मचारी त्या ठिकाणी रवाना झाले आहेत. हत्तींना कोणी हुसकवण्यासाठी पुढे जाऊन नये. ते पाणी पिण्यासाठी खाली आले असावेत. कोणीही आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.
VIDEO - रानटी हत्तीचा वावर, घोटगेवाडीवासीय भयग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2019 06:03 IST