व्हिक्टर डान्टसना आता निवडणूक लढवावी लागणार
By Admin | Updated: April 23, 2015 00:34 IST2015-04-22T23:04:55+5:302015-04-23T00:34:35+5:30
जिल्हा बँक निवडणूक : अवघे तीनच अर्ज वैध

व्हिक्टर डान्टसना आता निवडणूक लढवावी लागणार
कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीसाठी हरकती घेतलेल्या ११ पैकी तीन जणांचे अर्ज वैध ठरले आहे. मालवण येथील आशिष परब यांचा अर्ज वैध ठरल्याने बिनविरोध झालेल्या व्हिक्टर डान्टस यांना आता निवडणूक लढवावी लागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाची निवडणूक जाहीर झाली असून या निवडणुकीसाठी १२५ अर्ज आले होते. यामध्ये छाननीतून काही अर्ज बाद झाले होते. छाननीनंतर काही उमेदवारांनी एकमेकाविरोधात हरकती घेतल्या होत्या. त्यामुळे अकरा जणांचे अर्ज अपिलात ठेवले होते. मालवण येथून व्हिक्टर डॉन्टस व आशिष परब या दोघांचेच अर्ज आले होते. मात्र, डॉन्टस यांनी परब यांच्या अर्जावर हरकत घेतल्याने त्यांचा अर्ज बाद ठरविण्यात आला होता. परब यांनी याबाबत अपील केले होते. या अपिलात त्यांचा वर्ग वैध ठरल्याने मालवणची बिनविरोध होणारी निवडणूक आता बिनविरोध होणार नाही. हरकती घेतलेल्या ११ पैकी आशिष परब (मालवण), मोहन देसाई (कळणे दोडामार्ग), दत्तारामन नाईक (वेतोरे वेंगुर्ले) या तिघांचे अर्ज कोकण विभागीय सहनिबंधक नवी मुंबईच्या विभागीय सहनिबंधक सहकारी संस्थेच्या अधिकारी डॉ. ज्योती पाटकर यांनी वैध ठरविले. आठ अर्ज अवैध ठरल्याची माहिती प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांनी दिली. (प्रतिनिधी)