वेंगुर्लेचा पुनाळेकर प्रथम
By Admin | Updated: August 24, 2016 23:46 IST2016-08-24T21:37:35+5:302016-08-24T23:46:30+5:30
छायाचित्र स्पर्धा : मालवण तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे कार्यशाळा

वेंगुर्लेचा पुनाळेकर प्रथम
मालवण : मालवण तालुका फोटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर असोसिएशनतर्फे मामा वरेरकर नाट्यगृह येथे फोटोग्राफी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी आयोजित छायाचित्र स्पर्धेत वेंगुर्लेचा अमेय पुनाळेकरने प्रथम क्रमांक पटकाविला. मुंबई येथील प्रसिद्ध सिनेछायाचित्रकार जयंत पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेत छायाचित्रणावर व्याख्यान, प्रश्नोत्तरे, जिल्हास्तरीय छायाचित्र स्पर्धेचे पारितोषिक वितरण केले.
यावेळी पंकज सादये, संघटना अध्यक्ष राजेश पारधी, परीक्षक शिरीष पेडणेकर, समीर म्हाडगुत, चेतन म्हापणकर, नवनीत मिठबावकर, विनायक भिलवडकर, वीरेश आंबेरकर, नारायण धुरी, शेखर परुळेकर, मिलिंद तावडे, सुहास म्हाडेश्वर, शैलेश मसुरकर, सुनील नाईक, गणेश गावकर, संतोष हिवाळेकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक अजय मुणगेकर व सूत्रसंचालन चेतन म्हापणकर यांनी केले. (प्रतिनिधी)
३७ स्पर्धकांची १00 छायाचित्रे
स्पर्धेत प्रथम अमेय पुनाळेकर (वेंगुर्ले), द्वितीय शैलेश तांबे (कणकवली), तृतीय संजय खराडे (मालवण), उत्तेजनार्थ प्रथम स्वानंद आठल्ये (कुडाळ), द्वितीय महेंद्र नानाशेठ पारकर (मालवण) यांनी पारितोषिके पटकाविली. या स्पर्धेत ३७ स्पर्धकांची
१०० छायाचित्रे होती.
नारायण धुरींचे कौतुक
दांडी येथील नारायण धुरी हे स्पर्धेत उतरलेले नसले, तरी त्यांनी प्रदर्शनासाठी लावलेली छायाचित्रे ही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये चमक दाखविणारी आहेत. धुरी यांनी आपल्या कलेला अधिक सक्षम बनविल्यास भविष्यात त्यांच्यातील कलाकार प्रसिद्धीस येऊ शकतो, असेही परीक्षक पेडणेकर म्हणाले.